गावठी कट्टा अन् जिवंत काडतुसे जप्त ; दरोडेखोरांची टोळी पकडली

0

नाशिक | शहर पोलिसांच्या युनिट 1 पथकाच्या धडक कारवाईत 7 अट्टल गुन्हेगार जेरबंद करण्यात आले आहे. त्यांनी शहरपरिसरातील अनेक गुन्ह्यांची कबूली दिली आहे. त्यांच्याकडून कार, दुचाकीसह गावढी कट्टा आदींसह सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सखोल चौकशीचे काम सुरू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

नितिन निवृत्ती पारधी (रा. मखमलाबाद), संभाजी विलास कवळे (रा. अंबड लिंकरोड), सोमनाथ हिरामण बर्वे (रा. मातोरी), नितिन विलास पिंगळे (रा. मातोरी), अनिल भाऊराव पवार (रा. सय्यद पिंप्री), शुभम दशरथ गायकवाड (रा. मुंगसरा) व देविदास मोतिराम पवार (रा. नवनाथनगर, नाशिक) या 7 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

युनिट 1 चे काँस्टेबल विशाल काठे, मोहन देशमुख, विशाल देवरे, स्वप्नील जुंद्रे, शांताराम महाले यांच्या पथकाला लाखलगांव (ता.जि. नाशिक) येथील गौरव पेट्रोल पंपावर पडलेल्या दरोड्यातील संशयीताची माहिती मिळाली.

यानुसार त्यावर पाळत ठेवण्यात आली व खात्री पटल्यावर त्वरीत नितिन पारधी याला ताब्यात घेण्यात आले. पारधीकडे सखोल चौकशी केली असता त्याने आडगांव पोलीस ठाण्यात दाखल पेट्रोल पंपावरील दरोड्याच्या गुन्ह्याची कबुली दिली.

तर त्याच्या माहितीनुसार त्याच्या गुन्ह्यातील इतर सहा आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या सुमारे 30 हजार 500 रुपये किमतीचा एक गावठी कट्टा जिवंत काडतुससह, 1 लाख किमतीची मोटारसायकल, 50 हजार रुपये किमतीची सॅट्रो कार, गुन्हा करतांना वापरलेले कपडे असा 1 लाख 80 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

*