नाशिकचे सिडको प्रशासकीय कार्यालय बंद होणार?

0
नवीन नाशिक (प्रतिनिधी) | नाशिक येथील सिडकोचे प्रशासकीय कार्यालय ३० जून पासून बंद करण्यात येंणार असल्याची माहिती मिळत असून येथील सर्व कारभार औरंगाबाद कार्यालयातून करण्यात येणार असल्याचे कळते.
या संदर्भात सिडकोच्या मुख्य संंचालकांनी आदेश दिल्याची माहिती मिळाली असून नाशिक कार्यालयातील सर्व यंत्रणा आटोपती घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

आज गुरूवार (दि.२२) रोजी सर्व सामान्य नागरिकांसाठी सिडकोचे कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. नाशिक येथील कार्यालय हलविल्यानंतर येथील सर्व प्रक्रिया ऑनलाईन यंत्रणेद्वारे औरंगाबाद येथून करण्यात येणार आहे. मात्र ऑनलाईन प्रक्रियेमुळे सर्वसामान्य ग्राहकांना किरकोळ कामांसाठी देखील मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

आजही दररोज किमान १०० ते १५० नागरीक वेगवेगळ्या कामांसाठी सिडको कार्यालयात हजेरी लावत असतात.
दरम्यान, या संदर्भात सिडको प्रशासक कांचन बोधले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अद्याप असे कुठल्याही प्रकारचे आदेश आलेले नाहीत.

तसेच महानगरपालिकेला हस्तांतरणाची कागदपत्रे तात्काळ द्यायची असल्याने स्कॅनिंगचे काम सुरू आहे. कर्मचारी संख्या कमी असल्याने स्थानिक नागरिकांच्या कामासाठी कमी वेळ द्यावा लागणार आहे, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार असली तरी महापालिकेच्या हस्तांतरणाच्या कामामुळे किमान १ महिना तरी गैरसोय सहन करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*