नाशिकची अंजली पाटील झळकणार रजनीकांतसोबत

0
नाशिक : सुपरस्टार रजनीकांतसह काम करण्याची संधी मोजक्या आणि नशीबवान कलाकारानांच मिळते.
नाशिकच्या अंजलीला अशीच एक संधी मिळाल्याने नाशिकच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा खोवला गेला आहे. नाशिकने बॉलीवूड, मराठी चित्रपटसृष्टीला अनेक कलाकार दिले आहेत.

चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके मुळचे नाशिकचेच  त्यामुळे चित्रपटसृष्टीतील सर्वांनाच नाशिकबाबत आदर आहे. असे असतांनाच जेव्हा नाशिकची मुलगी दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेता रजनीकांतसोबत अभिनय करणार असल्याची बातमी जर कानावर पडली तर आनंद द्विगुणीत होणारच.

या अभिनेत्रीचं नाव आहे अंजली पाटील. मूळची नाशिकची असलेली अंजली लवकरच रजनीकांत यांच्यासह रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असणारा ‘काला कारिकालन’ या सिनेमात अंजली झळकणार असून मराठी चित्रपट सृष्टीसोबातच अवघ्या महाराष्ट्राला या चित्रपटाची ओढ लागली आहे.

खुद्द अंजलीनेच तिच्या ट्विटरवरुन ही गुड न्यूज शेअर केली आहे. काला कारिकालन हा रजनीकांत यांचा आगामी तमिळ सिनेमा असून त्यांचा जावई धनुष या सिनेमाची निर्मिती करणार आहे. तर कबाली फेम प. रणजिथ या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.

LEAVE A REPLY

*