स्पेन येथे नाशिकचे तबला वादक कला सादर करणार

0

पंचवटी । दि. 20 प्रतिनिधी
येथील पवार तसेच वसंत तबला अकादमीचे विद्यार्थी स्पेन मध्ये 26 जून ते 2 जुलै दरम्यान होणार्‍या इंटरनॅशनल फेस्टीवल मध्ये आपली कला सादर करणार आहे.

या फेस्टीवल मध्ये जगातील 15 देशातील कलाकार सहभागी होणार असून या विद्यार्थ्या सोबतच शहरातील अभिजात नृत्य-नाट्य-संगीत अकादमीच्या सुमारे 22 विद्यार्थीनी देखील सहभागी होणार आहे.

येथील पवार तबला अकादमीचे विद्यार्थी मल्हार चिटणीस, सोहम खाडीलकर, अभिषेक गिते, प्रसाद भालेराव, अनिरुध्द नल्ली, ईशान जानोरकर, अद्वय पवार व वसंत अकादमीचा कल्याण पांडे या स्पर्धेत सहभागी होणार आहे.

या इंटरनॅशनल स्पर्धेत कथक, तबला वादन, फ्युजन, पेरड अश्या वेगवेगळ्या प्रकारात हे विद्यार्थी सहभागी होत आहे. या सर्व विद्यार्थ्यांना पवार तबला अकादमीचे नितीन पवार तसेच अभिजातच्या विद्या देशपांडे, भक्ती देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

LEAVE A REPLY

*