तुम्हाला २०१९ मध्ये पाहून घेईन; नरेंद्र मोदींचा भाजप खासदारांना इशारा

0

दिल्ली : संसदेत भाजप संसदीय पक्षाची बैठक झाली.

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा / राज्यसभा खासदारांचा क्लास घेतला.

गैरहजर राहणा-या खासदारांना तंबी दिली. सुधारणा केली नाही तर २०१९ मध्ये पाहून घेणार असल्याचा इशारा मोदींनी दिला आहे.

‘तुम्ही स्वत:ला काय समजता? तुम्हीच काय, मीदेखील काहीच नाही. भाजप एक पक्ष आहे,’ असा शब्दांमध्ये मोदींनी खासदारांना खडसावले. ‘तीन ओळींचा व्हिप काय आहे? वारंवार व्हिप का जारी करावा लागतो? संसदेत हजर राहण्याच्या सूचना का द्याव्या लागतात?,’ असे अनेक प्रश्न मोदींनी खासदारांची शाळा घेताना उपस्थित केले. ज्याला जे वाटतेय, त्याने ते करावे. मी २०१९ मध्ये बघून घेईन,’ अशा कडक शब्दांमध्ये मोदींनी खासदारांना इशारा दिला. संसदीय दलाच्या बैठकीला पंतप्रधान मोदींसह पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपचे खासदार उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी अमित शहा यांनी लाडू भरवून त्यांचे स्वागत केले.

LEAVE A REPLY

*