नान्नज येथे तीन मुर्तींची विटंबना, गावात कडकडीत बंद

0
जामखेड (प्रतिनिधी) – तालुक्यातील नान्नज येथील गोपाळपुरा येथील तीन मुर्तींची अज्ञात समाजकंटकानी विटंबना केली. ही घटना ग्रामस्थांना समजल्या नंतर घटनेचा तीव्र निषेध करत अरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी गावात बंद पाळण्यात आला.
तालुक्यातील नान्नज गावातील गोपाळपुरा येथे आसणार्‍या दत्त मंदिर, महादेव मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, गणपती मंदिर व पांडुरंगाचे मंदिर असे पाच मंदिरे आहेत. ही मंदिरे गावाची ग्रामदैवत म्हणून ओळखली जातात. या ठिकाणी मोठी आषाढी रथयात्रा असते. गावचे श्रध्दास्थान असलेल्या या पाच मंदिरापैकी दत्त मंदिराच्या हाताची, गणपतीच्या बोटांची व महादेवाच्या मंदिरासमोरील नंदिची विटंबना अज्ञात समाजकंटकांनी केली.
मंदिराचे पुजारी सोमनाथ अरुण क्षिरसागर हे नेहमी प्रमाणे पुजा करण्यासाठी गोपाळपुरा येथील मंदिरात आले असता मुर्तींची विटंबना झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती ग्रामस्थांना कळताच मोठा जमाव गोपाळपुरा मंदिराच्या परिसरात जमा झाला होता. यानंतर ही घटना पोलिसांना कळवण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब पोकळे व प्रभारी तहसीलदार विजय भंडारी घटनास्थळी आले. त्यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली. यावेळी आरोपींना अटक होत नाही तो पर्यंत गावातप बंद पाळण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.
दुसर्‍या दिवशी विटंबना झालेल्या मुर्ती काढून त्या जागी प्रतिमा स्थापित करण्यात आल्या. पोलिसांनी गावात शांतता पाळण्याचे आवाहन केले असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात मंदिराचे पुजारी सोमनाथ क्षिरसागर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

*