मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाखाचा धनादेश

0
शहादा । दि.21 । ता.प्र.-शहरातील एका युवकाचा गेल्या पावसाळ्यात लळींग तलावात बुडून मृत्यू झाला. त्याच्या वारसांना मृख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रुपयांचा धनादेश आ.उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते देण्यात आला.
महालक्ष्मी नगरातील नाना इंदवे यांचा तरूण मुलगा मच्छिंद्र नाना इंदवे (वय 22) हा गेल्यावर्षी धुळे तालुक्यातील लळींग बंगला येथे कार्यक्रमास गेला होता.
त्यावेळी पाऊस जास्त झाला. तेथील तलाव पाण्याने भरला होता. तेथे मच्छिंद्र इंदवे मित्रांसह आंघोळीस गेला होता. यावेळी त्याचा बुडून मृत्यू झाला होता.

मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबातील वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळावा याकरीता आ.पाडवी यांनी पाठपुरावा केला. आज तहसील कार्यालयात त्याची आई लताबाई व वडिल नाना इंदवे यांना एक लाखाचा धनादेश आ.पाडवी यांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी तहसीलदार मनोज खैरनार, डॉ.उल्हास देवरे, भाजपा तालुका अध्यक्ष डॉ.किशोर पाटील, जिल्हा सरचिटणीस दिनेश खंडेलवाल, नगरसेविका रिमा पवार, के.एम. पवार, जयेश देसाई, मनोज चौधरी, हितेंद्र वर्मा, हेमराज पवार, नजमोद्दीन खाटीक, बंटी धोबी, पियुष चोरडीया, महेश पाटील व पंकज सोनार उपस्थित होते.

यावेळी आ.पाडवी यांनी सांगितले, देवाच्या नावास साजेसे काम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. तळोद्यातील दोन भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना सहाय्यता निधीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे आ.पाडवी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन डॉ.उल्हास देवरे यांनी केले.

 

LEAVE A REPLY

*