शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली, शिक्षकांचे काय ?

0
नवापूर । दि.29 ।-शासनाने शेतकर्‍यांचे कर्जमाफ करून शेतकर्‍यांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न करून शेतकरी व परिवाराला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला.
असे असले तरी दुसरीकडे शिक्षकांकडे मात्र शासनाचे दूर्लक्ष होत आहे. याकडे लवकर लक्ष दिले नाही तर या वर्गा आत्महत्या करावी लागेल काय असा सवाल फडणवीस सरकारला या वर्गाकडून विचारला जात आहे.
ऱाज्यात असा एकमेव वर्ग आहे जो भरती बंद केल्यामुळे गेल्या दहा बारा वर्षापासुन शिक्षकाची नोकरी करून तीदेखील बिनपगारी अशा शिक्षक बांधवांकडे शासनाने लवकर लक्ष दिले नाही तर राज्यातील शिक्षकांना आत्महत्येचे सत्र सुरू करावे लागेल काय असा सवाल या शिक्षक बांधवांकडून विचारला जात आहे.

आज गेल्या कित्येक वर्षापासूनहा शिक्षक बिचारा राज्यात भरती बंद व समायोजनाच्या प्रश्नामुळे संस्थाचालकांसह कित्येक वर्षापासून वेतनासाठी लढत असून ते कसे तरी आपल्या परिवाराचा गाडा पुढे चालवित आहेत.

त्यात काहिनी आपल्या जमिनी गहाण ठेवल्या आहेत तर काहिनी कर्जाचा डोंगर वाढविला आहे केवळ एकच आशेवर की शासन काहरतरर निर्णय घेईल.

सबका साथ सबका विकास म्हणणारे शासन शिक्षकांचा विकास का अटकवित आहे हे समजत नाही. जो देशाचे भविष्य घडविणारा आहे नेमक्या त्याच्याच भविष्याला अटकवुन त्याच्यावर आर्थिक संकट आणून शासन शिक्षकाला आत्महत्या करण्यासाठी प्रेरीत करणार आहे का खुद शिक्षणमंत्र्यांनी दोनवर्षापासून मराठी दिनी एका वृत्तवाहिनीवर जाहीर केले होते की शिक्षक समायोजनाचा प्रश्न लवकरच आटोक्यात येईल, मागणीप्रमाणे नवीन भरती केली जाईल.

पण दोन वर्ष उलटूनसुध्दा त्यांच्याकडून सदर प्रश्न मिटला नाही ही खेदाची बाब आहे. माध्यमिक विभागात समायोजन आहे परंतु कनिष्ठ महाविद्यलयामध्ये समायोजन नसतांना पदांना मान्यता मिळत नसून शासनाला येणार्‍या कालावधीत याचे प्रायश्चित भोगावे लागेल यात शंका नाही.

कारण जो व्यक्ती देशाचाप्रधानमंत्री घडवू शकतो तो राज्याचा मुख्यमंत्री बदलू शकणार नाही का? याचा विचार शासनाने करणे गरजेचे आहे. म्हणून राज्यातील शिक्षकांचा प्रश्न आता मार्गी लागणे गरजेचे आहे.

 

LEAVE A REPLY

*