सामाजिक सलोखा राखणे प्रत्येकाची जबाबदारी

0
तळोदा । दि.26 । श.प्र.-तळोदा शहरात राष्ट्रीय एकात्मता बंधु भाव सामाजिक सलोखा राखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे समाज सलोख्यासाठीची भूमिका कौतुकास्पद असून मराठी पत्रकार संघाच्या या विविध उपक्रमातुन दिसून येते असा सूर उपस्थित मान्यवरांनी इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केला.
तळोदा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर, हिन्दू – मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.

इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, आ.उदेसिंग पाडवी हे होते. तहसीदार योगेश चन्द्रे, पोलिस उप अधीक्षक शिवाजी गावित, पोलिस निरीक्षक मिलिंद वाघमारे, न पा गटनेते भरत माळी, भाजपा प्रदेश सदस्य डॉ.शशिकांत वाणी, मौलाना शोएब रजा नूरी, नगरसेवक संजय माळी, गौरव वाणी, पंकज राणे, अजय परदेशी, निसार मक्रानी, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश ठाकरे, माजी नगरसेवक सुभाष चौधरी, अनिल माळी, हेमलाल मगरे, डॉ.स्वप्नील बैसाने, अकबर शेख, अकील अंसारी, रईसअली अब्बास अली, इम्तेयाज कुरैशी, शब्बीर पिंजारी हितेंद्र क्षत्रिय, योगेश मराठे, संदीप परदेशी, अदि उपस्थित होते

याप्रसंगी जिल्हाधिकारी, मल्लिनाथ कलशेट्टी, आमदार उदेसिंग पाडवी, मौलाना शोएब रजा नूरी, निसारदादा मक्राणी, आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की; इफ्तार पार्टी मुळे जातीया सलोखा जपन्यास मदत होते बंधुभाव भाईचारा अधिक वृंदिगत होतो तसेच तळोदा शहरात पूर्वीपासून असलेल्या या दोन्ही पंथियांचे एकीचा संबंधाचे दाखले दिलेत.

हिन्दु – मुस्लिम या दोन्ही पंथियांनी गुण्या गोविंदयाने रहात, शहराची शांतता कशी टिकून राहील या बददल ही मार्गदर्शन केले. येणार्‍या काळात तळोदा शहराला समाज कंटकांमुळे लागलेला डाग पुसून काढण्यास दोन्ही समाजाच्या वतीने प्रयत्न झाले पाहीजे.तळोदा शहराचे नाव राज्यभरात हिंदू मुस्लिम एकतेसाठी ओळखले जाईल.

 

 

LEAVE A REPLY

*