‘नागा’सोबत केला 17 कि.मी.चा प्रवास

0
शहादा । दि.02 । ता.प्र.-तालुक्यातील लोहारे येथे शेतीचे कामे आटोपून शहादा येथे दुचाकी वाहन चालकाच्या पायावर काहीतरी चढत असल्याचे लक्षात येताच भेदरलेल्या शेतकर्‍याने वाहन सोडून पळ काढला.
त्या वाहनावर दीड-दोन फुटाचा नाग सतरा किलोमीटर प्रवास केल्यानंतर बाहेर निघाला होता. ही घटना रविवारी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.
येथील हितेश अशोक पाटील (वय 25) हा त्यांची लोहारा शिवारात शेती आहे. सकाळी शेतावर गेला होता. दिवसभरातील शेतीचे काम आटोपून दुपारी चार वाजेनंतर तो हिरो ग्लॅमर या दुचाकीवाहनाने शेतातून निघाला.

लोहारे ते शहादा सुमारे 17 किलोमीटर अंतर आहे. हितेश पाटील एकटा निघाला होता. शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या जवळपास वाहन पोहोचले. वाहन चालू असतांना उजव्या पायावर काहीतरी चढत असल्याचे लक्षात आले.

वाहन हळूवार करून पाहिले तर त्याच्या पायावर साप चढत होता. ते बाजूला सारून भेदरलेल्या या शेतकर्‍याने वाहन रस्त्यावरच सोडले.

दरम्यान जवळच असलेल्यांनी काय घटना घडली याची विचारणा केली असता तो थरथर कापत भेदरलेल्या शेतकर्‍याने सर्व हकीगत सांगितली.

यावेळी सर्पमित्रांना भ्रमणध्वनीने संपर्क करून ते चार-पाच युवकांसोबत पोहाचले व त्यांनी वाहनातून नाग बाहेर काढला. सर्पमित्रांनी साप पकडल्यानंतर शेतकर्‍याच्या मनाला दिलासा मिळाला.

या सर्पमित्रांनी तो नाग जंगलात सोडून दिला आहे. काळाने प्रयत्न केला. मात्र, शेतकर्‍याची वेळ आली नव्हती अशी चर्चा परिसरात रंगत होती.

 

LEAVE A REPLY

*