सभासदांच्या विश्वासामुळे पतसंस्थेची दमदार वाटचाल

0
शहादा । दि.27 । ता.प्र.-नोटाबंदीच्या काळातही सभासदांच्या विश्वास सार्थ ठरविण्यात संस्थेला यश आले. सभासदांच्या हिताला प्राधान्य देत वैद्यकीय उपचार शिक्षण यासाठी विकास निधीच्या माध्यमातून संस्थेने पुढचे पाऊल टाकले असून सभासदांच्या विश्वासातूनच संस्थेने आर्थिक क्षेत्रात दमदार वाटचाल सुरू केली आहे, असे प्रतिपादन हरियाअली क्रेडीट सोसायटीचे चेअरमन तैय्यब नुरानी यांनी सर्वसाधारण सभेत बोलतांना सांगितले.
येथील हरियाअली अर्बन क्रेडीट सोसायटीची बारावी वार्षिक सभा मलोणी येथील हरिअली इस्टेटमध्ये झाली. अध्यक्षस्थानी चेअरमन तैय्यब नुरानी होते. यावेळी कार्यकारी अध्यक्ष नुहभाई नुरानी, व्हा.चेअरमन ज्ञानेश्वर चौधरी, प्रा.जे.झेड. पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना तैय्यब नुरानी म्हणाले, संस्थेच्या स्थापनेपासून सतत अ वर्ग मिळविणार्‍या या संस्थेने केंद्रसरकारच्या नोटबंदीच्या काळातही सभासदांना आर्थिक अडचणी भासु दिल्या नाही.

सभासदांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरली. सध्या पतसंस्थेची स्थिती खालावत जात असतांना याउलट संस्थेने आपल्या विश्वासाच्या बळावर आर्थिक क्षेत्रात दमदार वाटचाल सुरू ठेवली आहे.

संस्थेने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवीत सभासदांच्या हितासाठी विकास निधींच्या माध्यमातून पुढचे पाऊल टाकला वैद्यकीय उपचारासाठी दहा हजार व शिक्षणासाठी पाच हजाराची तरतूद केली आहे.

अपघाती मदतीसाठी 50 हजार व नैसर्गिक मृत्यूसाठी 11 हजाराचे आर्थिक सहाय्यता तरतूद करणारी एकमेव संस्था असल्याचेही ते अभिमानाने म्हणाले.

कार्यकारी अध्यक्ष नुहभाई नुरानी म्हणाले, संस्थेच्या ठेवींमध्ये यंदा तीन कोटीची वाढ हे सभासद व संचालकमंडळ व अधिकार्‍यांचे सांघिक श्रेयातून शक्य झाले आहे.

सभासदांच्या हितासाठी संस्था कटीबध्द असल्याचेही ते म्हणाले. अहवाल वाचन व्यवस्थापक विजय पाटील यांनी केले. आभार ज्ञानेश्वर चौधरी यांनी मानले. सभेला सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*