वीजेच्या धक्क्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

0
शहादा । ता.प्र.-तालुक्यातील होळगुजरी शिवारात शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या दिव्येश रणजीतसिंग गिरासे (रा.डोंगरगांव) या पंधरा वर्षीय शाळकरी मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना काल दि.25 रोजी रात्री आठच्या सुमारास घडली.
तालुक्यातील डोंगरगांव येथे राहणारा दिव्येश रणजीतसिंग गिरासे (वय 15) याची शेतजमीन होळगुजरी शिवारात आहे.

रात्री आठच्या सुमारास तो शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी गेला असता त्यावेळी पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेला असता त्यास विद्युत वायरचा शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.

दिव्येश हा इयत्ता 9 वी वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे वडील व आजोबा आधीच मयत झाले आहेत. त्याच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे डोंगरगांव गावात हळहळ व्यक्त होत आहे.

 

LEAVE A REPLY

*