शहादा येथे दीड लाखाची घरफोडी

0
शहादा । दि.01 । ता.प्र.-तालुक्यातील डोंगरगावलगत नितीननगर भागात रो हाऊसमधील कुटूंब कानुबाईच्या कार्यक्रमास गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला.
लोखंडी कपाटाचा दरवाजा टॅमी दगडाने फोडून कपाटातील रोख 1 लाख सदुसष्ट हजार रूपये चोरांनी लंपास केले आहे.
नितीननगर भागात रो-हाऊसींग सोसायटीच्या तळमजल्यावर संजय बन्सीलाल जगताप व निंबाजीराव बन्सीलाल जगताप हे दोघे भाऊ मुलांच्या शिक्षणासाठी एकत्र राहतात.
शनिवारी त्यांच्याकडे असलोदला (शहादा ) कानुबाईची स्थापना होती. शनिवारी निंबाजीराव जगताप यांच्या मुलाने स्टेट बँकेतून एक लाख रूपये रोख रक्कम वटवून आणली होती.

रक्कम घरात येताच संजय जगताप यांनी घेऊन जाण्यासाठी सांगितले होते. मात्र, अडचण आल्याने ते सहकुटूंब असलोदकडे निघून गेले.

त्यानंतर निंबाजीराव जगताप यांनी सदर रक्कम घरातील लोखंडी कपाटात ठेवून घराला कुलूप लावून गावी निघून गेले. कपाटात अगोदरची 63 हजार रक्कम होती. गावी कानुबाईचे उत्सव व रोट असल्याने घरी कोणीच नव्हते.

रो-हाऊसचे घराचा दरवाजा बंद असल्याचे चोरांना लक्षात आल्याने त्यांनी रविवारच्या रात्री घराचे कुलुप तोडत आत प्रवेश केला.

लोखंडी कपाटाचा खालचा भाग टॅमीने वाकवित फरशीचा तुकड्याने कपाटाचे लॉकर तोडीत त्यातील रोख 1 लाख 67 हजार रूपये चोरांनी लंपास केले.

त्याचवेळी कपाटात महिलेच्यी सोन्याची मंगल पोत व इतर सोन्याचे दागिने चांदीचे तसेच पडून होते. जगताप कुटुंब गावी जात होते, त्यावेळी शेजारीस असलेल्या एका इसमास घराकडे लक्ष देण्यास सांगितले होते.

सदर इसमाने घराकडे नजर टाकली तर कुलुप लटकलेले दिसले. ही घटना सोमवारी रात्री 8.30 वाजेस लक्ष्यात येताच संजय जगताप हे पंधरा मिनीटात घरी पोहचले त्वरीत पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली.

त्यामुळे श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. संजय जगताप यांच्या घरातील कुलूप लोखंडी रॉड जप्त कप्त करीत इतर स्थळांची ठसे घेतली आहेत.

तसेच श्वानपथकाने डोंगरगाव रोड वरील डॉ. स्वप्नील सोनार यांच्या फिजोओथेरपी रूग्णालयापर्यंत माग काढला श्वानपथक पुढे सरकले नाही.

याबाबत निंबाजीराव जगताप यांनी शहादा पोलीसात तक्रार दिली असून घटनेबाबत गुन्हा दाखल आहे. पुढील तपास स.पो.नि.जाधव करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*