उकाळापाणी वनक्षेत्रातील अतिक्रमण हटविले

0
नवापूर । दि.2 । प्रतिनिधी-तालुक्यातील मौजे उकाळापाणी नियतक्षेत्र वनक्षेत्र नवापूर येथे आज राखीव वनात अनधिकृत झालेले 9 हेक्टर अतिक्रमण नष्ट केले व 3 हेक्टरमध्ये जे.सी.बी मशिनच्या सहायाने सखोल जलशोषक खोदून अतिक्रमणधारकांनी मज्जाव केला. दरम्यान, पुढच्या मोहिमेत खेकडा येथील अतिक्रमण काढण्यात येणार आहे.
जंगलात नवीन अतिक्रमण जोरात सुरु होत होते. जंगलात जिवंत झाडाखाली आग लावुन ते नष्ट करण्याचा प्रयत्न सुरु होता.
संपुर्ण जंगल अतिक्रमण काढण्यात आले आहे. तेथे झोपड्या तसेच लाकुड तोडण्याचे अवशेष दिसून आले, ते सर्व नष्ट करण्यात आले आहे.

ही मोहीम सकाळी 7 ते सांयकाळी उशिरा पर्यत सुरु होती. यावेळी राज्य राखीव पोलिस दलाचे 10 पोलिस कर्मचारी, 4 महसुल विभागाचे कर्मचारी, 4 माजी सैनिक, 5 नंदुरबार उपविभागाचे 100 कर्मचारी अशा एकुण 119 कर्मचार्‍यांचा ताफा अतिक्रमण काढण्यासाठी उपस्थित होता.

सदर अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याअगोदर 3 वेळा नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. तरीसुध्दा अतिक्रमणधारक अतिक्रमण काढत नव्हते. त्यामुळे वनविभागाचा मोठा फौजफाटा घेऊन हे अतिक्रमण कडक बंदोबस्तात काढण्यात आले आहे.

या कारवाईमुळे अतिक्रमणधारक धास्तावले आहे. ज्यांनी जंगलात अतिक्रमण करुन पेरण्या केल्या होत्या. त्यांची सर्व पिके नष्ट करण्यात आली आहेत.

आता पुढच्या मोहिमेत कारवाई मौजे खेकडा भागात नोटीसा देऊन काढण्यात येणार आहे. सदर कारवाई उपवनसंरक्षक अधिकारी श्रीमती पीयुषा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वनअधिकारी धुळे दक्षता उमेश वावरे, नंदुबार सहायक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे, नवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, चिंचपाडा वनक्षेत्रपाल आर.बी.पवार यांनी केली.

 

LEAVE A REPLY

*