नर्मदा विकास कार्यालयाला घेराव

0
नंदुरबार । दि.02 । प्रतिनिधी-2003 नमर्देच्या व उपनद्यांच्या बुडीताच्या पातळया ठरविण्यासाठी नर्मदा विकास विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणातून 226 प्रकल्प बाधितांची घरे व शेती बुडीतात जाईल यावर शिक्कामोर्तब झाले होते.
अशा प्रकल्पबाधितांनी सरदार सरोवर प्रकल्पाकडे घोषितांसाठी केलेल्या दाव्यांमध्ये नर्मदा विकास विभागाने खोटे अभिप्राय दिल्याने व त्यामुळे बुडीत होवूनही पुनर्वसनाचे लाभ मिळण्यासाठी अपात्र ठरलेल्या विस्थापितांनी नर्मदा विकास विभागाला जाब विचारला.
प्रत्येकाच्या शेती व घराचे खरे तलाक व खरे नकाशे दिल्याशिवाय उठणार नाही अशी भुमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. अघोषित प्रकल्पबाधितांबरोबरच घोषित प्रकल्प बाधित यांचे वसाहतींमध्ये स्थलांतर झाले.

जमिनी मिळाल्या परंतु सिंचनाचे लाभ मिळाले नाहीत. अशांना सिंचनाची भरपाई देण्याचे जिल्हाधिकारी स्तरावरून आदेश निघूनही त्यावर कार्यवाही करण्याचे काम नर्मदा विकास विभागाचे असतांना टाळाटाळ केली जात आहे. याचा जाब विचारण्यासाठी व भरपाई घेतल्याशिवाय उठणार नाही असा पवित्रा घेत आंदोलन सुरू राहिले.

पुनर्वसन वसाहतींमध्ये सोयीसुविधांची जबाबदारीही नर्मदा विकास विभागाची असतांना झालेले निकृष्ट बांधकाम, सोयी सुविधांचे राहिलेले अपूर्ण बांधकाम व त्यात झालेला भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश आयुक्तांनी दिल्यानंतर त्यावर कायय कारवाई झाली. असा सवाल प्रकल्पबाधितांनी केला.

पुनर्वसन वसाहतींचे हस्तांतरण जि.प. कडे करतेवेळी सर्व सोयी सुविधा पूर्ण न करता जि.प.कडे हस्तांतरण करण्यात आले ते कसे असाही सवाल बाधितांनी नर्मदा विकासाला केला.

मुळ गावात व पुनर्वसन वसाहतीमध्ये बांधलेले निकृष्ट दर्जाचे शेड, तात्पुरते निवारे हे नर्मदा विकास विभागाच्या हलगर्जीपणा साबीत करणारे आहेत.

सरदार सरोवर धरणाचे गेट बंद करणार असल्याने येणार्‍या बुडीताला शेकडो विस्थापितांना सामोरे जावे लागणार आहे. जिल्हाधिकार्‍यांनी गावोगावी काढलेल्या नोटीशीमध्ये लोकांची स्थावर जंगम मालमत्ता बुडीत क्षेत्रातून हलवण्याचे स्पष्ट नमूद आहे.

जे बुडीतातील गावात मुळ अद्यापही पुनर्वसनाशिवाय लोक रहात असल्याचे सिध्द करते असे असतांना पुनर्वसनाचे काम पूर्ण झाल्याशिवाय एकही घर स्थलांतरीत करणार नाही असा इशारा प्रकल्प बाधितांनी दिला.

यावर्षी येणार्‍या अनैसर्गिक बुडीताचे आपती व्यवस्थापनाचा आराखडा लोकांनी मागितला. सरदार सरोवर सारख्या महाकाय धरणामध्ये बुडीतात आलेल्या संपत्तीचे संपादन अजूनही बाकी ठेवल्याचा धिक्कार लोकांनी केला.

पुनर्वसनाशिवाय गावातून बळजबबरीने लोकांना स्थलांतरीत केल्यास आंदोलन करण्यात येईल अशाराही यावेळी देण्यात आला. पत्रकावर ललिता राजपूत, चेतन साळवे, योगीनी खानोलकर, पुन्या वसावे, पुरजी वसावे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

LEAVE A REPLY

*