लाच घेतांना पर्यवेक्षक गजाआड

0
शहादा / घर बांधकामाचा नकाशा देण्यासाठी 500 रूपयांची लाच घेतांना शहादा पालिकेतील रेकॉर्ड विभागातील सहाय्यक खरेदी पर्यवेक्षक सुभाष दौलत मराठे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
ही कारवाई दुपारी 12 वाजेच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा नगरपालिकेत रेकॉर्ड विभागात सुभाष दौलत मराठे हा सहाय्यक खरेदी पर्यवेक्षक पदावर कार्यरत आहे.

त्याच्याकडे मुळ तक्रारदाराने शहादा शहरातील प्लॉट नं. 79 चे 17 जुलै 1998 ला जावक्र क्र.1037/1998 नुसार मंजूर घर बांधकामाचे राहते घराच्या वरच्या मजल्याचे बांधकाम करण्यासाठी मंजूर बांधकामाचा नकाशा देण्यासाठी मागणी अर्ज केला होता.

त्यासाठी मराठे यांनी तक्रारदाराकडे नकाशा देण्याकरीता 500 रूपयाची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांच्याकडे तक्रार केली होती.

तक्रारीनुसार आज सकाळपासूनच लाच प्रतिबंधक विभागाने पालिकेच्या आवारात सापळा लावला होता. दुपारी 12 वाजेच्या सुमारास रेकॉर्डरूम विभागात सुभाष दौलत मराठे (रा.नंदुरबार) यांनी तक्रारदाराकडून 500 रूपयाची लाच स्विकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने उपअधिक्षक एस.टी. जाधव यांनी त्यांच्या पथकासह केली. या घटनेने पालिका परिसरात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

*