रजाळे येथे शॉर्टसर्कीटमुळे घराला आग

0
नंदुरबार / तालुक्यातील रजाळे येथील शॉर्ट सर्कीटमुळे घर जळून खाक झाले आहे. यात लाखोचे नुकसान झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की,
रजाळे येथील शेतकरी रोहिदास रघुनाथ पाटील यांच्या घराला आज सकाळी 8 ते 9 या दरम्यान भीषण आग लागल्यामुळे संसारोपयोगी वस्तू पूर्णतः जळून खाक झाल्यामुळे संसार उघड्यावर आला आहे.

आग विझविण्यासाठी ग्रामस्थ तसेच युवकांनी जिकीरीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. रोहिदास पाटील यांचे लाकडाचे घर होते.
आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे युवकांनी घराच्या छतावर चढून मोठी कसरत करून लाकडे तसेच दाबली वरील माती खाली फेकून आग आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली.

तरीही आग वाढतच असल्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी यावेळी नंदुरबार येथे अग्नीशमक दलाला पाचारण करण्यात आले. या आगीत टी.व्ही.संच, गोदरेज कपाट व त्यातील साहित्य तसेच 70 हजार पैशांची रोख रक्कम तसेच सोने व संसारोपयोगी वस्तू आणि घर पूर्ण जळून खाक झाले.

यावेळी महसूल विभागातर्फे पंचनामा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

LEAVE A REPLY

*