सारंगखेडा बाजारेपेठेत सी.सी.टि.व्ही. कॅमेरे लावा !

0
सारंगखेडा / येथील मुख्य बाजारेपेठेत सी.सी.टिव्ही कॅमेरे लावण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
येथील बाजारपेठेत होणार्‍या वाढत्या चोर्‍या, हाणामार्‍या, छेडखानी, वाहतुकीची कोंडीचे प्रकार वाढले आहेत.
शहरात आठवडे बाजाराच्या दिवशी मोठी गर्दी असते. वाहतुकीवर नियंत्रण नसल्याने वाहने बाजारातून जातात. त्यामुळे वाहतुकीची नेहमीच कोंडी होते.
तसेच बाजारात महिलांची छेडछाड, भुरटया चोर्‍या मोबाईल व महिलांचे छेडछाड भुरटया, चोर्‍या मोबाईल व महिलांचे पर्स लांबवणे, हाणामारी या घटना नित्याच्याच होत्या.

महाविद्यालयात जाणार्‍या मुलींना त्रास सहन करावा लागतो. गुन्हेगार शोधण्यासाठी पोलीसांनी मोठी कसरत करावी लागते. अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे पोलीसांची तारांबळ उडते.

यावर आळा घालण्यासाठी मुख्य रस्ते, मंदिर परिसर, बसस्थानक, महत्वाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात यावे अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

*