सुरक्षा अधिकारी प्रशिक्षणासाठी 44 युवक रवाना

0
नंदुरबार / न्युक्लिअस बजेट व कौशल्य विकास योजनेतंर्गत आदिवासी जमातीच्या कॅम्पमध्ये निवड झालेल्या 44 युवकांच्या गटाला सिक्युरिटी प्रशिक्षणासाठी बेळगावला रवाना जाणार्‍या युवकांना जिल्हाधिकार्‍यांनी शुभेच्छा दिल्या.
न्युक्लिअस बजेट व कौशल्य विकास अंतर्गत एकात्मिक आदिवासी प्रकल्प नंदुरबार यांनी अनुसूचित जमातीच्या युवक व युवतींसाठी प्रशिक्षणासाठी दोन निवड कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
त्यात मुंबई येथील इंडीयन आय सिक्युरिटी कंपनीतर्फे निवड कॅम्पमध्ये 44 युवकांची निवड केली. त्या 44 युवकांच्या गटाला सिक्युरिटी कंपनीच्या बेळगाव येथील कॅम्पमध्ये 30 दिवसाच्या प्रशिक्षणास पाठविण्यात आले.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्या युवकांना 10 ते 15 हजार नोकरी मिळेल. काल सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी युवकांमध्ये संवाद साधून त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

LEAVE A REPLY

*