13 वर्षीय बालिकेवर बलात्कार करणार्‍यास सश्रम कारावास

0
नंदुरबार / दीड वर्षापुर्वी कुटूंबियासोबत घरात झोपलेल्या 13 वर्षीय बालिकेचे तोंड दाबून अत्याचार केल्याची घटना नंदुरबार येथे घडली होती.
या गुन्ह्यात दोषी अससेल्या नराधमाला चार वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्याचा निकाल नंदुरबार अतिरीक्त सत्र व जिल्हा न्यायालयाने दिला आहे.
नंदुरबार शहरातील मोठा माळीवाडा भागातील श्रीराम चौकात एक कुटूंबिय भाडेतत्वाने राहत होते. दि.12 जानेवारी 2016 रोजी रात्री 13 वर्षीय बालिका आपल्या कुटूंबियांसोबत घरात झोपलेली होती.
यावेळी गुरव गल्लीत राहणारा हरी उर्फ हरीष भरत गुरव याने दि.13 जानेवारी रोजी पहाटे 3 वाजेनंतर घरात झोपडलेल्या बालिकेजवळ येवून तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला.

सदर प्रकार घरात झोपलेल्या बालिकेच्या आई, वडीलांच्या लक्षात आल्याने ते उठले असता संशयीत हरी गुरव यास पळून जातांना पाहिले.

घडलेला प्रकार बालिकेने आपल्या आई वडीलांना सांगितला. याबाबत पिडीत बालिकेने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार हरी गुरव याच्यावर लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 च्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक वाय.एस.भदाणे यांनी करून आरोपी हरी गुरव याच्याविरूध्द सबळ पुरावा मिळाल्याने न्यायालयाने दोषारोपत्र सादर केले.

हा खटला नंदुरबार येथील अतिरीक्त सत्र व जिल्हा न्या.आ.एस.गुप्ता यांच्या कोर्टात चालविण्यात आला. यात सरकारपक्षातर्फे पिडीत बालिका, तिचे आई, वडील, भाऊ यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, पोलीस नाईक, महिला पोलीस नाईक, पोलीस उपनिरीक्षक अशा एकूण 11 साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या.

साक्षीदारांनी दिलेल्या जाब जबाबावरून न्यायालयाने त्यांच्या साक्षी गाह्य धरून अत्याचार करणार्‍या हरी उर्फ हरिष भरत गुरव यास चार वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा विविध कलमान्वये सुनावली आहे.

यात भादंवि कलम 452 प्रमाणे एक वर्षाचा सश्रम कारावास व एक साधा तुरूंगवास तसेच लैगिक अपराधापासून बालकांचा संरक्षण कायदा कलम 8 प्रमाणे तीन वर्षाच्या सश्रम कारावसाची शिक्षा व 2500 रूपयांचा दंड, दंड न भरल्यास तीन महिन्याची साधी तुरूंगवासाची शिक्षा याप्रमाणे नराधमाला चार वर्षांची शिक्षा दिली आहे.

या खटल्याचा निकाल नंदुरबार येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्या.आर.एस. गुप्ता यांनी दिला. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील विजय चव्हाण यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

*