नंदुरबार जिल्हा शंभर टक्के तंटामुक्त करावा – जिल्हाधिकारी

0
नंदुरबार / महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम अभियानात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करुन नंदुरबार जिल्हा येत्या काळात शंभर टक्के तंटामुक्त होईल असे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिम संदर्भात बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. श्री. कलशेट्टी बोलत होते.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण राकेश महाजन, उप विभागीय पोलीस अधिकारी व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे तंटामुक्त काम पाहणारे पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी म्हणाले की, सन 2007 मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिम सुरु केली असून मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

तंटामुक्त गांव झाल्यास त्या गावात विविध विकासाची कामे चांगली होतात यात ग्रामसभेचा मोठा सहभाग असतो. नंदुरबार जिल्हा पेसा कायद्याअंतर्गत येत असल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आवश्यक ते निर्णय घेण्याचे अधिकार आहेत.

ही मोहिम जिल्ह्यात शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.श्री. घमंडे, यांनी यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिमेबाबत माहिती दिली.

LEAVE A REPLY

*