गणित संबोध प्रगल्भीकरण कार्यशाळा

0
नंदुरबार / प्राथमिक स्तरावरील गणित विषयाचे अध्यापन अमूर्त स्वरुपात न होता प्रमाणकांच्या मदतीने गणिताची दृष्य स्वरुपात मांडणी होणे, विद्यार्थ्यांचे मुलभूत संबोध स्पष्ट करण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल असे प्रतिपादन सुलभक उदय केदार यांनी केले.
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, नंदुरबारच्या वतीने पहिली ते पाचवीला शिकविणार्‍या शिक्षकांसाठी श्रॉफ हायस्कूल येथे गणित संबोध प्रगल्भीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
संस्थेचे प्राचार्य डॉ.आर.डी. कांबळे, जिल्हा गणित समन्वयक शिवाजी ठाकूर व सुलभक रविकिरण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजीत करण्यात आली.

विद्यार्थ्यांचे गणितातील मुलभूत संबोध स्पष्ट करण्यासाठी नैसर्गिक व शास्त्रीय अध्यापन पद्धतींवर चर्चा करण्यात आली. उपस्थित शिक्षकांनी आपल्या अध्यापनातील नाविण्यापूर्ण बाबींचे सादरीकरण केले.

जिल्ह्यातील पहिली ते पाचवीच्या वर्गांना शिकविणार्‍या शिक्षकांनी गणित संबोध प्रगल्भीकरण कार्यशाळेसाठी ऑनलाईन नोंदणी करून मागणी केलेली आहे.

अद्याप 1149 शिक्षकांनी प्रशिक्षणाची मागणी केली आहे. मागणी केलेल्या या सर्व शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे नियोजन विद्याप्राधिकरण, जिल्हा परिषद शिक्षणविभाग व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यामाने करण्यात येईल, अशी माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ.आर.डी. कांबळे यांनी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

*