ट्रॉलाच्या हुलकावणीने बस पुलाखाली उतरली

0

तळोदा । गुजरात राज्य परिवहन मंडळाच्या बसला ट्रॉलाने हुलकावणी दिल्याने बसचालकाला बस पुलाखाली उतरवावी लागली. आज सकाळी गुजरात राज्याची अंकलेश्वर-दोंडाईचा बस सकाळी येत असताना खर्डी नदीजवळील भरवाड वस्तीजवळ समोरून येणार्‍या ट्रॉलाने हुलकावणी दिली.

बसचालक कटारा मानाभाई धनाभाई यांनी प्रसंगावधान राखून बस पुलाखाली उतरवली. सुदैवाने बस कठड्यावर अडकल्याने पलटी झाली नाही. त्यामुळे होणारी हानी टळली.

बसमध्ये एकूण 38 प्रवासी होते. सदर बस ही अंकलेश्वर डेपोची असून जीजे 2284 क्रमांकाची आहे. ती अंकलेश्वरहुन पहाटे 5.30 वाजता दोंडाईचाकडे निघाली होती.

कंडक्टर पी.डी. पटेल, सुनंदा नरेंद्र चव्हाण नवोदय विद्यालय अक्कलकुवा, आशिष रमेश मोरे, रामुभाई पुरुषोत्तमभाई चकोरिया, रुद्रास राजुभाई, मंजुळाबाई रामदास मराठे, रामदास शिवराम मराठे हिंगणी, राजेंद्र रमेश मंगळे, मंदाबाई राजेंद्र मंगळे अंकलेश्वर हे सारंगखेडा यात्रेला जात होते.

सुनिल शिलदार ठाकूर, चांदसूर्या भावेश, सायसिंग मालचे, योगीताबाई भावेश मालचे कोळदे, आकाश भावसिंग व भावसिंग ठाकूर पानसेमल, संजुभाई मकाभाई शिरपूर, बाबूलाल दलमा, सुभाष बाबूलाल व कृष्णा सुदाम लंगडीभवानी रमेश कमा काठवाडी शिरपूर, शैलाबेन व रोहिदास हिरा तडवी चोपडगाव, ब्रिजेशकुमार महाराजसिंग राजपूत अक्कलकुवा, विजय हरून मोरे, चिखलीबोट आदी प्रवासी होते.

गुजरात राज्याची अंकलेश्वर दोंडाईचा बस ही पहाटे येत असताना रिमझिम पाऊस पडत होता व समोरून येणार्‍या ट्रकने हुलकावणी दिल्यानेबस ड्रायवर ने प्रसंगावधान दाखवून बस ब्रासमध्ये उतरवली. त्यामुळे सुदैवाने होणारी हानी टळली.

LEAVE A REPLY

*