मौखिक स्वास्थ्य तपासणी मोहिम सुरू

0

नंदुरबार । येथील जिल्हा रुग्णालयात 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार्‍या मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी अनिल पाटील व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कांतराव सातपुते, नंदुरबारचे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ.कल्पेश चव्हाण, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ.हार्दिक पटेल आदी उपस्थित होते.

यावेळी नंदुरबारचे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ.कल्पेश चव्हाण यांनी मौखिक आरोग्याचे महत्व, मुख्य कर्करोग, मौखिक आरोग्य तपासणी मोहिम राबविण्याच्या उद्देश व जिल्ह्यात राबविण्यात येणार्‍या मोहिमेचा कृती आराखडा याविषयी माहिती दिली.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये यांनी मौखिक आरोग्याबाबत घ्यावयाची काळजी व मुख्य कर्मरोगाबद्दल जनजागृती मोहिमेद्वारे कशी करावयाची आहे याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर, कर्मचारी व बाह्यरूग्ण विभागातील रुग्ण व त्यांच्यासोबत असलेले नातेवाईकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

*