पिंपळनेर येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

0
पिंपळनेर / घरातून फुस लावून अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिच्यावर बलात्कार करणार्‍या नराधमाला पोलिसांनी सटाणा परिसरातून अटक केली.
त्याला न्यायालयात हजर केले असता दि.22 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, गोपाळनगरमध्ये राहणार्‍या अल्पवीयन मुलीला काहीतरी फूस लावून दि.11 एप्रिल रोजी पळवून नेले. या संदर्भात पिंपळनेर पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली.
त्यानंतर मुलीचे वडिलांनी परिसरात राहणार्‍या व्यक्तीवर संशय व्यक्त केला. त्यावरून दि.20 रोजी मुलाचे वडील अरुण जगन पवार, सुनंदा अरुण पवार, शितल अरुण पवार, विक्की अरुण पवार व राहूल अरुण पवार यांच्याविरूध्द भादंवि 363, 366, 34 व पोवसो 4 व 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर मुलीला शोधण्यासाठी पोलिसांनी सर्व प्रयत्न केले होते. मोबाईल लोकेशनवरुनही शोधण्याचा प्रयत्न केला असता तो नराधम मिळून आला नाही.

नंतर तर मोबाईलच बंद झाला. गोपनीय माहितीवरुन दि.17 रोजी रात्री दोन वाजता सटाणा परिसरात राहूल अरुण पवार व सदर मुलगी दोघे मिळून आल्याने त्यांना अटक करून ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतर त्या मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता त्या मुलीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर राहूल पवार विरूध्द वाढीव 376 कलम लावण्यात आले.

न्यायालयात राहूल पवार याला हजर केले असता त्याला 22 तारखेपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

सदर कारवाई ही एपीआय सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ प्रविण अमृतकर, भूषण वाघ, पंकज वाघ यांनी केली.

LEAVE A REPLY

*