15 महिन्यानंतर लागला आरोपींचा शोध

0
नंदुरबार / नवापूर येथील रेल्वे स्टेशन मास्टरचा खून करुन घरातील लाखो रुपयांचे दागिने चोरुन नेल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.6 मार्च 2016 रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास नवापूर शहरातील जूना आर.टी.ओ. नाका, शिवराम पाटील नगरमध्ये राहणारे रेल्वे स्टेशन मास्टर प्रभातकुमार नागेश्वर सिंग (वय 49) यांच्या घरात अज्ञात इसमांनी दरोडा टाकला होता.
त्यांनी मागील दरवाजा ठोकल्याने प्रभातकुमार यांच्या पत्नी सरिताबाई सिंग यांनी दरवाजा उघडल्याने दोन अनोळखी इसम जबरदस्तीने घरात घूसले व प्रभातकुमार यांच्या डोक्यावर लोखंडी सळईने व चाकूने मारुन गंभीर जखमी केले होते.
तसेच कपाटातील सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. त्यानंतर उपचारादरम्यान प्रभातकुमार यांचा मृत्यू झाला होता. याबाबत नवापूर पोलीस ठाणेला गुर.नं. 25/2016 भा.द.वि.क. 302, 394 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होवून सुमारे 15 महिन्याचा कालावधी होवूनदेखील मारेकर्‍यांबाबत माहिती मिळून येत नव्हती. गुन्हयातील अज्ञात इसमांचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी उघडकीस न आलेले गुन्हयातील आरोपींचा तात्काळ शोध घेवून गुन्हे उघडकीस आणण्याच सुचना दिल्या.

जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे यांनी दोन स्वतंत्र विशेष तपास पथक स्थापन केले.

पथक क्रमांक 1 मध्ये असई रविंद्र लोंढे, पोकॉ भटू धनगर, दोन्ही नेमणूक स्था.गु.अ.शाखा, नंदुरबार, पोहेकॉ प्रदिप राजपूत, म्हसावद पोलीस ठाणे, पथक क्रमांक-2 मध्ये पोहेकॉमहेंद्र नगराळे, पोकॉ शांतीलाल पाटील दोन्ही नेमणुक नवापूर, पोकॉ राकेश भिकन वसावे नेमणुक पोलीस मुख्यालय अशांना नेमून गोपनिय माहिती घेवून बातमीदार सक्रीय करुन पथकातील कर्मचार्‍यांना सुचना व मार्गदर्शन देवून रवाना केले होते.

तपास पथकातील कर्मचार्‍यांनी घटनेच्या अनुषंगाने सर्व बाजूंनी तपास करून गुप्त बातमी काढली. संबधीत आरोपींचे नावे निष्पन्न करुन मिळालेल्या माहीतीवरुन अंतेश अभिमन मावची (वय 22), अविनाश उर्फ ढवळी राजू गावीत (वय 19), दोन्ही रा.नया होडा, नवापूर, जयसिंग उर्फ प्रभू दिल्या मावची (वय 18) व राहूल पंनत्या मावची दोन्ही रा.झामणझर ता.नवापूर यांचा शोध घेवून त्यांना विश्वासात घेवून विचारपूस केली असता, त्यांनी चोरी करण्याचे उदेशाने सदर गुन्हा केल्याची कबूली दिली.

घटनेच्या दिवशी 7 आरोपी चोरी करण्याच्या उदेशाने शिवराम पाटील नगर येथे गेले होते. त्यापैकी वरील आरोपींनी घटनास्थळी मयत व फिर्यादीच्या घराचा मागील दरवाजा टॉमीने तोडून जबरदस्तीने घरात घुसून मयत व फिर्यादी यांना जबर मारहाण केली होती.

त्यात प्रभातकुमार हे औषधोपचार चालू असतांना मयत झाले. त्यांच्या पत्नीने फिर्याद दिल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आर.एस. पाटील करीत होते.

LEAVE A REPLY

*