नंदुरबार पालिकेवर 42 नगराध्यक्षांचे प्रतिनिधीत्व

0

महेश पाटील,नंदुरबार । नंदुरबार नगरपालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत शहराला 42 नगराध्यक्ष लाभले असून आता 43 व्या नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु आहे.

पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विविध पक्षांची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून 30 पर्यंत माघारीची मुदत आहे.

त्यानंतर दि. 13 डिसेंबरला मतदान व 14 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. नंदुरबार पालिकेसाठी 19 प्रभागातून 39 नगरसेवक पदासाठी निवडणुक होत आहे.

पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पद सर्वसाधारण गटासाठी असून जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. नंदुरबार पालिकेसाठी होणार्‍या निवडणुकीत शहरातील 1 लाख 263 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

यात 50 हजार 381 स्त्रिया, 49 हजार 880 पुरुष व 2 इतर मतदारांचा समावेश आहे. निवडणूकीसाठी 126 मतदान केंद्रे राहणार आहेत.

दि. 13 डिसेंबर रोजी या उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद होणार आहे. यासाठी प्रचार शिगेला पोहचला आहे. दररोज प्रचार रॅल्या, कॉर्नर सभा, ऑटो रिक्षाच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे.

नंदुरबार नगरपालिकेच्या इतिहासात 42 नगराध्यक्ष

नंदुरबार पालिकेत आतापर्यंत 42 नगराध्यक्षांनी प्रतिनिधीत्व केले असून आता 43 व्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुक प्रक्रिया सुरू आहे.

नंदुरबार पालिकेत 1910 निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. पहिले नगराध्यक्ष म्हणून वासुदेव महादेव बेहेरे यांची निवड झाली होते.

नगराध्यक्षपदाची निवड

नगरपालिका निवडणुकीत जनतेतून निवडण्याची प्रक्रिया तीनवेळा झाली असून 2017 च्या नगरपालिका ही निवडणुक जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याची चौथी निवडणुक ठरणार आहे.

याआधी 1973 मध्ये नगराध्यक्षपदाची पहिली निवडणुक झाली होती. यात रामचंद्र बिसनलाल माहेश्वरी यांनी मोहनसिंग परदेशींचा पराभव केला.

1978 सालीही रामचंद्र बिसनलाल माहेश्वरी विजयी झाले होते. 2002 च्या निवडणुकीत सौ.रत्ना रघुवंशी यांनी हिरालाल मगनलाल चौधरी यांचा पराभव केला होता.

2017 सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा रघुवंशी कुटूंब व चौधरी कुटूंब नगराध्यक्षपदासाठी आमनेसामने उभे आहेत. यात कोण बाजी मारत हे येत्या 14 डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

नगराध्यक्ष कार्यकाळ

वासुदेव महादेव बेहेरे 1910- 11 ते 1917-18
भाईलाल पुरूषोत्तमदास 1918-19 ते 1921-22
गोपाल यादव पारखे 1922-23 ते 1925-26
ठाकोरलाल भाईलाल शाह 1926-27 ते 1928-29
टिकमल नथ्थुभाई श्रॉफ 1929-30 ते 1931-32
गजानन महादेव मोडक 1932-33 ते 1934-35
शंकरराव चिंधुजी बेडसे 1935-36 ते 1936-37
कन्हैय्यालाल सुपडूभाई शाह 1937-38 ते 1939
गजानन महादेव मोडक 1938- 39 ते 1940-41
मणिलाल डायाभाई शाह 1941-42 ते 1944-45
दंगुलाल मोहनदास वाणी 1946 ते 1947
अंबालाल खुशालदास पटेल 1948 ते 49
डॉ.संपत एन.देसाई 1949 ते नोव्हेंबर 1950
कन्हैय्यालाल राजाराम परदेशी 1953 ते 1956
वेडू गोविंद पाटील 1957 ते1960
रामचंद्र बिसनलाल माहेश्वरी 16 फेब्रुवारी 1961ते फेबु्र 1962
रामचंद्र बिसनलाल माहेश्वरी 17 फेब्रुवारी 1962 ते 15 ऑगस्ट 1964
रूपचंद आचलदास शाह 16 ऑगस्ट 1962 ते17 फेब्रुवारी 1963,
बटेसिंग कन्हैय्यालाल रघुवंशी 18 फेब्रवुरी 1963 ते 15 मे 1965,
वेडु गोविंद पाटील 13 मे 1965 ते 14 जून 1966
उत्तमलाल रतिलाल शाह 27 जून 1066 ते 6 ऑगस्ट 1967
रामचंद्र बिसनलाल माहेश्वरी 7 ऑगस्ट 1967 ते 11 ऑगस्ट 1969
मोहनसिंग कन्हैय्यालाल परदेशी 28 ऑगस्ट 1970 ते6 एप्रिल 1973
लक्ष्मणदास सुपडू शाह 6 एप्रिल 1973 ते 17 एप्रिल 1973
रामचंद्र बिसनलाल माहेश्वरी 18 एप्रिल 1973 ते 16 डिसेंबर 1974
रामचंद्र बिसनलाल माहेश्वरी 17 डिसेंबर 1974 ते 21 फेब्रुवारी 1975
मोहनसिंग कन्हैय्यालाल परदेशी 15 मे 1985, ते 14 ते 1990
विठ्ठलराव रघुनाथ शेळके 15 मे 1985, 14 डिसेंबर 1990
रविंद्र मोहनसिंग परदेशी 4 जानेवारी 1991 ते 16 डिसेंबर 1996
इंदूबाई हिरालाल चौधरी 17 डिसेंबर 1996, ते 23 डिसेंबर 1997
सुंदरबाई रसिकलाल पेंढारकर 24 डिसेंबर 1997 ते 23 डिसेंबर 1998
शिलाबाई रमेश कडोसे 29 जून 1999 ते 2 जुलै 99
सुंदरबाई रसिकलाल पेंढारकर 7 जुलै 1999, 29 जून 2000
तुलसी पेबंनराम बालाणी 24 डिसेंबर 2000 ते 27 डिसेंबर 2001
जगदिशचंद्र रमेशचंद्र वळवी 8 जानेवारी 2002 ते 23 डिसेंबर 2007
सौ.रत्ना चंद्रकांत रघुवंशी 24 डिसेंबर 2002 ते 24 डिसेंबर 2007
सौ.रत्ना चंद्रकांत रघुवशीं 24 डिसेंबर 2007 ते 12 ऑगस्ट 2008
सौ.रत्ना चंद्रकांत रघुवंशी 29 फेब्रुवारी 2008 ते 6 एप्रिल 2010
सौ.रत्ना चंद्रकांत रघुवंशी 7 मे 2010 ते 23 जून 2010
कुणाल बटेसिंग वसावे 24 जून 2010 ते 23 डिसेंबर 2010
सौ.रत्नाबाई चंद्रकांत रघुवंशी 24 डिसेंबर 2012 ते आजपर्यंत.

LEAVE A REPLY

*