तळोदा पालिकेतर्फे ‘सर्वांसाठी घरे’

0
मोदलपाडा / पालिकेतर्फे पंतप्रधान आवास योजनेतंर्गत सर्वांसाठी घरे ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत गरजूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्षा सौ.रत्ना चौधरी यांनी केले आहे.
या योजनेसाठी बेघर, आर्थिक दुर्बल घटक तसेच शासकीय जागेवरील झोपडपट्टीधारक, अल्प उत्पन्न गट यांना लाभ देण्यात येणार आहे. घर बांधकामासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनुदानही मिळणार आहे.

वार्षिक तीन लाखापर्यंत उत्पन्न असणार्‍यांना 30 चौ.मी. 322 चौरस फुट क्षेत्रफळ असलेले घर तर सहा लाखापर्यंत उत्पन्न असणार्‍यांना 60 चौरस मीटर 644 चौरस फुट क्षेत्रफळाचे घर मिळणार आहे.

पंतप्रधान आवास योजना पालिकेमार्फत राबवली जाणार आहे. त्यासाठी पालिकेत उपलब्ध असलेला विहित नमुन्यातील आवेदन पत्र करून पालिकेत जमा करावे.

 

LEAVE A REPLY

*