वीज मीटर तपासणीसाठी आलेल्या अभियंत्यास धक्काबुक्की

0
नंदुरबार / शहरातील साक्रीनाका परिसरात घराचे वीज मीटर तपासणीसाठी आलेल्या अभियंत्यास धक्काबुक्की करुन वाईट शिवीगाळ केली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
याबाबत परस्परविरोधी फिर्याद देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप राधेश्याम सावंत रा.बोरसेनगर, गोंदूर रोड, धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,
ते साक्रीनाका परिसरात राहणारे पंकज नामदेव चौधरी यांच्याकडे घराचे मीटर मंद गतीने चालत असल्याची तक्रार आल्याने ते तपासणीसाठी गेले असता त्याचा राग येवून त्यांना पंकज चौधरी यांनी धक्काबुक्की करुन वाईट शिवीगाळ केली.
तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला व तपासाचा पंचनामा फाडून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पंकज चौधरी याच्याविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अशीच फिर्याद आशाबाई नामदेव चौधरी यांनी दिली आहे. त्यात म्हटले आहे की, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप सावंत यांनी घरात कोणी नसल्याचे पाहून अश्लिल शिवीगाळ केली.

तसेच धक्काबुक्की करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी प्रदीप सावंत यांचेविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात भादंवी कलम 354, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*