चार हजार नवमतदारांची नोंदणी

0
नंदुरबार / मतदार जागृती अभियानात चार हजार नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.
जानेवारी महिन्यापासून निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नवमतदार नोंदणी मोहिम घेण्यात आली होती. यात सुमारे 2 हजार 38 पुरुष आणि 2 हजार 88 महिला मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.
एकूण चार हजार 127 नव्याने नोंदणी झालेल्या या मतदारांपैकी एक मतदार हे तृतीयपंथी आहेत. पुरूषांच्या तुलनेत नवमतदार महिला दीड टक्क्याने वाढल्या आहेत.

18 वर्षे वय पूर्ण करणार्‍या युवक आणि युवतींनी चांगला प्रतिसाद दिल्याने जिल्ह्यात 55 टक्के नोंदण्या करण्यात प्रशासनाला यश आले आहे. उर्वरीत नोंदणी न झालेले, स्थलांतरीत, नोकरी व कामानिमित्त जिल्ह्यात आलेले, नावात बदल असलेले, विवाह करून सासरी आलेल्या महिला यांचा समावेश आहे.

 

LEAVE A REPLY

*