नवापूर येथे बचतगटांना फिरता निधी वाटप

0

नवापूर । प्रतिनिधी-नवापूर नगरपालिका दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत 10 महिला बचत गटांना 10 हजार रुपये प्रत्येक गटाला 10 हजाराचा फिरता निधी वाटपाचा कार्यक्रम नगराध्यक्षा सौ.रेणुका गावीत यांच्या हस्ते वाटप करण्यात आला.

यावेळी मंचावर न.पा.गटनेते गिरीष गावीत, विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, अजय पाटील, चंद्रकांत नगराळे, शिरीष प्रजापत, आशिष मावची, सौ.सुशिला अहिरे, रिना पाटील, अनिता मावची, मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक करतांना प्रकल्प अधिकारी प्रशांत भट म्हणाले की, नवापूर शहरात एकुण 110 महिला बचत गट आहेत. निरनिराळे बचत गट यांचा चांगला व्यवसाय सुरु आहे.

या अभियांनांतर्गत वेगवेगळे प्रशिक्षण देण्यात येतात. यामध्ये महिलांचा सर्वागीण विकास करण्याचे काम नगरपालिका करीत आहे. महिलांना या माध्यमातून रोजगार मिळून ते चांगले काम करत आहेत.

यानंतर मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे म्हणाले की, महिलांनी एक चांगला उद्योग निवडला पाहिजे. वेगवेगळे साहित्य बनविणे व अन्य व्यवसायात प्रगती करावी.बॅकेची कर्जाची परत फेड नियमीत करावी. जेणेकरुन तुम्हाला व्यवस्यात अडचण येणार नाही,असे सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिनाक्षी भट, दानीयल मावची यांनी परीश्रम घेतले. या महिला बचत गटांना देण्यात आलेला फिरता निधी मेराली याहा बचतगट (करंजीओवारा), पुष्पवन महिला बचत गट (नेहरुनगर), हाजीअली महिला बचत गट, अस्मिता महिला बचत गट, दिपीका महिला बचतगट, वर्षा महिला बचत गट, कुंकुबा महिला बचत गट, बेलदार महिला बचतगट, मदीना महिला बचतगट, एकलक्ष महिला बचतगट यांना देण्यात आला.

LEAVE A REPLY

*