जलयुक्त शिवार अभियानाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा !

0
धुळे / जलयुक्त शिवार अभियानाच्या 2016- 2017 मधील कामांना संबंधित सर्व विभागांनी समन्वयातून गती देत ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, असे निर्देश नाशिक विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांनी येथे दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सकाळी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
आयुक्त श्री. झगडे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानातील कामांमध्ये लोकसहभाग वाढविला पाहिजे. गॅबियन बंधार्‍यांची संख्या वाढवावी.

तसेच सामाजिक दायीत्व निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. याशिवाय प्रत्येक गावाचे दरडोई उत्पादन काढून ते वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

कृषी विभागाने प्रत्येक गावाचा मार्केट प्लॅन तयार करावा. आदिवासी विकास विभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील एक गाव मॉडेल व्हिलेज म्हणून विकसित करावे, असेही निर्देश आयुक्त श्री. झगडे यांनी दिले.

यावेळी आयुक्त श्री. झगडे यांनी मागेल त्याला शेततळे, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, पीककर्ज पुनर्गठन, तूर खरेदीचा आढावा घेतला.

LEAVE A REPLY

*