महिला लोक अदालतीमध्ये केवळ एकच अर्ज

0
नंदुरबार / महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा महिला लोकअदालात सुरू करण्यात आली. मात्र याकडे महिलांची उदासीनता दिसून येत आहे, याला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते.
या महिला लोक अदालतमध्ये केवळ एकच अर्ज प्राप्त झाला. यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी तत्काळ उपाययोजना करण्याचे सुचविले.

शासनाने महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्यावरील अन्याय, अत्याचाराला वाचा फोडून त्यांना न्याय मिळून देण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत महिला लोकअदालतीचे आयोजन दरमहा करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार दरमहा येथे महिला अदालत होते. मागील काही महिन्यांपासून विचार केल्यास महिला लोकअदालतींमध्ये अल्पप्रमाणात तक्रारी घेवून येताना दिसतात.

त्या मपगणीची कारणे ठोसपणे सांगता येणार नाही. मात्र, महिला लोकअदातीबाबत महिलांमध्ये उदासीनतेचे चित्र आहे.

महिला लोक अदालतसाठी जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी यांनी नियोजन केले इतर कामे बाजूला ठेवून महिलांच्या समस्यांना प्राधान्य देण्यासाठी सकाळी 11 महिला लोक अदालत घेतली मात्र बराच वेळ कोणीही महिला आल्या नाही.

काही वेळेनंतर एक महिला तक्रार घेवून आल्या. यामुळे अधिकार्‍यांचाही निरूत्साह दिसून आला.

 

LEAVE A REPLY

*