मुख्यमंत्री उद्या नंदुरबारात

0
नंदुरबार / राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 17 मे 2017 रोजीच्या नियोजित दौर्‍याच्या पार्श्वभुमीवर राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृह येथे विविध विभागाच्या अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली.

या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे उपस्थित होते.

ना.रावल यावेळी म्हणाले की, या दौर्‍यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नंदुरबार जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा, झालेल्या कामांच्या ठिकाणी भेटी व जिल्ह्यातील अधिकार्‍यांसमवेत बैठक घेणार आहेत.

यासाठी विविध विभागांनी जिल्ह्यात केलेल्या कामांची वस्तुनिष्ठ माहिती मुख्यमंत्र्यांना सादर करावी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी.

सादरीकरण करतांना जिल्ह्यातील विकास कामांवर आधारीत माहिती सादर करण्याच्या सूचनाही पालकमंत्री ना. रावल यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

 

LEAVE A REPLY

*