अपघातातील मयत व्यक्तीस मारून टाकल्याचा संशय

0
नंदुरबार / तालुक्यातील सोनगीरपाडा येथे 15 दिवसापूर्वी अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीस घातपात केल्याच्या संशयावरुन एकास दहा जणांनी बेदम मारहाण केली.

लक्ष्मण बकाराम पवार रा.सोनगीरपाडा ता.नंदुरबार याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सोनगीरपाडा गावातील पाचीराम चौरे याच्या घरासमोर लक्ष्मण व त्याचे सहकारी यांनी 15 दिवसापूर्वी अपघातात मरण पावलेल्या सचिन मोतीराम चौरे याचा घातपात केल्याच्या संशयावरुन त्यांना किरण मोतीराम चौरे, दिनेश बापू चौरे, अर्जून धुडक्या चौरे, किशोर धुडक्या चौरे, कैलास भट्या चौरे, रविंद्र पंडीत गावीत, अजय बापू चौरे, गोरख ब्रिजलाल चौरे, महेंद्र चंदू चौरे, राहुल पंडीत गावीत सर्व रा.सोनगीरपाडा यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दहा जणांविरूद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*