पप्पुभैय्याकडून तळोदेकरांना 50 लाखांचा चुना?

0
तळोदा / नऊ वर्षापासून वास्व्यास असलेलया राजस्थान येथील पप्पुभैय्या पावभाजीवाला नामक इसमाने तळोदेकरांना सुमारे 50 लाखात गंडवून पोबारा केल्याचे समजते.
याबाबत उपलब्ध माहितीनुसार, राजस्थान येथील रहिवासी असलेल्या पप्पुभैय्या पावभाजीवाला हा अनिल कोचर यांच्या मालकीचे आशिष पार्कमध्ये वास्तव्यास होता.
गेल्या 9 वर्षापासून तो राहत असल्याने त्याने तळोदेकरांचा विश्वास संपादन केला होता. पालिकेसमोर भाडेतत्वावर दुकाने घेवून त्याने हॉटेल थाटली.
काही वर्षापासून हॉटेलवर त्याचा चरितार्थ चालत होता. काही दिवसातच शहरातील प्रतिष्ठीत लोकांमध्ये त्याची गणना होवू लागली.

लोकांचा विश्वास असल्याचा फायदा घेत त्याने शहरातील अनेकांकडून कर्जावू पैसे घेतले. पैसे परतीच्या वेळी मात्र त्याने या ना त्या कारणाने टाळाटाळ केली.

पैशांची व्यवस्था होत नसल्याने पप्पुभैय्याने तळोद्यात हॉटेलचा व्यवसाय मंदावला असल्याने शहादा येथे पटेल रेसिडेन्सीसमोर जागा घेतली. तेथे हॉटेल सुरू करणार असल्याची खोटी बतावणी केली.

शुक्रवारी दुपारी त्याने त्याच्या दुकानाला कुलूप लावले तर रात्री 11.30 वाजेच्या सुमारास आशिष पार्कमध्ये त्याच्या भाडेत्वावरील घरातून साहित्य भरत असतांना घरमालक अनिल कोचर यांना अचानक जाग आल्याने त्यांनी विचारणा केल्यावर शहादा येथे जात असल्याचे सांगितले तसेच त्यांचे तीन महिन्यांपासून थकीत असलेले घरभाडेही दुसर्‍या दिवशी देणार असल्याचे सांगून पोबारा केल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*