बोगस लाभार्थी दाखवून अनुदान हडपले

0
नवापूर । दि.23 । प्रतिनिधी-पंतप्रधान घरकुल आवास योजना व स्वच्छ भारत योजने अंतर्गत सुलभ शौचालय व पेसा कायदा अंतर्गत देण्यात येणार्‍या निधीत बंधारे ता.नवापूर गावात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे.
संबंधीत प्रशासकीय यंत्रणेने घरकुल तसेच शौचालयाचे बोगस लाभार्थी दाखवून त्यांच्या नावे लाखो रुपयांचा निधी हडप करण्यात आला आहे. याबाबत तहसिलदार प्रमोद वसावे यांना बंधारे ग्रामस्थांतर्फे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बंधारे.ता.नवापूर या गावासाठी महाराष्ट्र शासनातर्फे विविध योजनांसाठी देण्यात येणार्‍या निधीमध्ये अनेक ठिकाणी भ्रष्टाचार झालेला असून त्याची योग्य ती चौकशी शासनामार्फत सामाजिक सर्व्हेक्षण करुन करण्यात यावी.

भ्रष्टाचार करणार्‍यांना योग्य ती शिक्षा देण्यात यावी. पंंतप्रधान घरकुल योजना स्वच्छ भारत योजना अंतर्गत सुलभ शौचालय बांधणे व पेसा कायदा अंतर्गत भ्रष्टाचार झालेला आहे.

बंधारे गावातील गरीब जनतेच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा ग्रामसेवक, सरपंच व इतर योजना राबविणार्‍या कर्मचार्‍यांनी जनतेची फसवणूक केली आहे.

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल योजनेत जोडलेल्या पिवळया व आँनलाईन यादीत जे नाव समाविष्ट केलेले आहेत.

त्यात मोठा भ्रष्टाचार आढळतो दलसिंग बी.नाईक यांचा नमुना नं.8 नसून त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आलेला आहे. सुरेंद्र यशवंत वसावे यांचा नमुना नं 8 नसून त्यांचा घरकुलाचा लाभ देण्यात आलेला आहे.

अमित व्ही.गावीत, दिलीप बी.वसावे यांना इंदिरा आवास योजने अंतर्गत व पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल योजनेचा दोनदा लाभ देण्यात आलेला आहे.

दिनेश सखाराम वसावे, सखाराम वसावे यांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल देण्यात आले होते परंतु त्यांनी घरकुल बांधलेले नाही.

रवी वसावे यांना पंतप्रधान योजने अंतर्गत घरकुल मंजुर झाले होते, परंतु त्याच्या योजनेची रक्कम ही दुसर्‍या व्यक्तीने काढुन घेतलेली आहे. अशा प्रकारे सदर योजनेत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे.

याबाबत गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांना निवेदन दिले होते. त्यांनी त्याची प्रकारची दखल घेतली नाही. त्याचीही चौकशी व्हावी.

अमित गावीत (विवाहीत) यांच्या घरकुलाला मान्यता दि.29 मार्च रोजी मिळाली यांच्या नावे दाखविले असुन त्या कुठल्याही प्रकारचे बांधकाम करुन दिलेले नाही.

तो आज देखील जुन्या कौलाच्या घरात राहत आहे. याचप्रमाणे पंतप्रधान घरकुल आवास योजनेतील अनेक व्यक्तींना कुठल्याही प्रकारचा योजनेचा लाभ दिलेला नाही. त्यांच्या नावावर ग्रामपंचायत बंधारे यांनी त्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे.

असे यादीत चुकीच्या पध्दतीने समाविष्ट केलेले आहे. स्वच्छ भारत अभियानांंतर्गत सुलभ शौचालय या योजने अंतर्गत येणारा निधी खर्च केलेला असून या लाभार्थी यांना कुठल्याही प्रकारचे शौचालय बांधून दिलेले नाही.

त्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. ग्रामपंचायती बंधारे येथील ग्रामपंचायतीने गावात शौचालय न बघता त्याचे खोटे फोटो काढून शासनाची फसवणुक केली आहे.

ज्या व्यक्तींना लाभार्थी ठरविण्यात आले आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ देण्यात आलेला नाही. लोकांना योजनेचा लाभ न देता त्यांचे चुकीच्या पध्दतीने नाव समाविष्ट करण्यात आले आहे.

त्यांच्या नावाचे पैसे संबंधीतानी हडप केलेले आहे. याची शासनातर्फे चौकशी व्हावी व जे अधिकारी भ्रष्टाचारात सहभागी आहेत त्यांची चौकशी व्हावी व त्यांच्यावर केसेस करुन योग्य ते शासन व्हावे.

पेसा कायदा अंतर्गत बंधारे गाव ग्रामपंचायतीत 5 टक्के निधी हा ग्रामपंचायत बंधारेला मिळत असे. त्यानुसार बंधारे ग्रामपंचायतीतला 7 लाख 98 हजार 800.28 रुपये असा निधी शासनाने पाठविला होता.

परंतु ग्रामपंचायतीचा वार्षिक वर्षे 2015 ते 2016 यात 47 लाख 56 हजार 861 एवढी रक्कम व ग्रामपंचायत जीआर मध्ये 4 लाख 58 हजार 638 रुपये दाखविली आहे.

यावर ग्राम़सेवकाचा सही शिक्का असलेला दाखला सोबत जोडलेला आहे. एवढया मोठया प्रमाणात बंधारे गावकरी व शासनाची फसवणूक झाली आहे.

याची सखोल चौकशी करुन यात जे-जे अधिकारी सामील असतील त्याच्यावर खटला दाखला करावा, त्यांचे त्वरीत निलंबन करावे व बंधारे गावातील खर्‍या लाभार्थ्यांना लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर बंधारा गावाचे रमिला वसावे, नरपत वळवी, कृष्णा वसावे, भामट्या गावीत, गोपाळ वसावे, दिनेश वसावे, राकेश वसावे, सुनिल वसावे, अशोक वसावे, अनिल वसावे, अनिल अरविंद वसावे, सुदाम वसावे, समिल वसावे, अशोक वसावे, संभाजी वसावे, संदिप वसावे, जितेंद्र गावीत, लालसिंग वसावे, जगन्नाथ वसावे, वेच्या गावीत, दिनेश वसावे, रविंद्र वसावे, सुरेश गावीत, वामन गावीत, अमृत वळवी, अर्जुन वसावे आदींच्या सह्या आहेत.

 

 

LEAVE A REPLY

*