उ.म. साहित्य परिषदेतर्फे साहित्य संमेलन

0
नंदुरबार । दि.21 । प्रतिनिधी-उत्तर महाराष्ट्र मराठी साहित्य सभा दरवर्षीप्रमाणे यंदादेखील उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नवोदीत साहित्यिक ग्रंथालय क्षेत्रात काम करणारे आणि सर्व सामान्य रसिकांसाठी ऑक्टोंबर 2017 मध्ये धुळे येथे साहित्य संमेलनाचे आयोजन करीत आहे.
या एकदिवशीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ.महेश केळुस्कर हे भूषविणार आहेत.
एक दिवशीय साहित्य संमेलनात विविध विषयांवर दोन चर्चा सत्रे तसेच निमंत्रित कवींच्या कवि संमेलनाचे नियोजन करण्यात आलेले आहे.

दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील स्व.निखील खडसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ललित, समिक्षा, चरित्र, कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, कविता याप्रकारातील उत्कृष्ट साहित्यासाठी तीन पारितोषिकांचे वितरण होणार आहे.

पारितोषिकांचे स्वरूप रोख रक्कम व मानपत्र असून प्रथम पारितोषिक 25 हजार, द्वितीय 15 हजार तर तृतीय पारितोषिक 10 हजार राहणार आहे.

तरी जिल्ह्यातील सर्व साहित्यिकांनी दि.1 एप्रिल 16 ते 31 मार्च 17 या कालावधीमधील प्रकाशित पुस्तकांच्या तीन प्रती दि.15 सप्टेंबरपर्यंत पाठविण्यात याव्यात पुरस्कारासाठी पाठविलेल्या प्रती परत दिल्या जाणार असून परीक्षकांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल.

साहित्य संमेलनाच्या आठ दिवस अगोदर संमेलनाची तारीख, वेळ तसेच ठिकाणी करण्यात येईल. असे आवाहन उमवि साहित्य संमेलनाचे सदस्य डॉ.पीतांबर सरोदे यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*