सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेंतर्गत लाखोंच्या विकासकामांचा शुभारंभ

0
नवापूर । दि.18 । प्रतिनिधी-शहरातील तीनटेंबा ते लालबारीपाडा येथे पालिका महाराष्ट्र सुवर्णजयंती नागरी नगरोत्थान महाअभियान योजनेंतर्गत पाण्याचा टॉकीचे बांधकाम करणे व पाणीपुरवठा वितरीत करणे या लाखोंच्या विकास कामाचा शुभारंभ माजी जि.प अध्यक्ष भरत गावीत व आदिवासी सहकारी कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक यांचा हस्ते श्रीफळ फोडुन करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा सौ रेणुका गावीत,उपनराध्यक्ष हारुण खाटीक,गटनेते गिरीष गावीत, विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, बांधकाम सभापती आयुब बलेसरीया, नगरसेवकअजय पाटील,चंद्रकांत नगराळे,आरीफ पालावाला, शेतकी संघाचे अध्यक्ष अजित नाईक, शिरीष प्रजापत, आशिष मावची, प्रा.ज्योती जयस्वाल, मेधा जाधव, सौ. रिना पाटील,सौ.सुशिला अहिरे, सौ.रजीला गावीत, सईदा शेख, अनिता मावची, कार्यालय निरीक्षक मिलिंद भामरे, माजी नगरसेवक विनय गावीत, रमला राणा, प्रा. नवल पाटील, हेमंत जाधव, जयनु गावीत, भालचंद्र गावीत आदी उपस्थित होते.

यावेळी माजी जि.प अध्यक्ष भरत गावीत म्हणाले की, आ. सुरुपसिंग नाईक व माजी खा.माणिकराव गावीत यांच्या प्रयत्नाने नवापुर शहरात सौर उर्जा अंतर्गत पथदिवे कामासाठी कोटी रुपये मंजुर करण्यात आले असुन त्या कामाचा शुभारंभ लवकर च करण्यात येणार आहे.

न.पा निवडणुकीत दिल्या कामाचा आश्वासनाची पुर्तता करीत आहोत. जी आश्वासने आम्ही दिली होती ती पुर्ण केली आहेत.

या मध्ये नाल्याचा कामासाठी कोटी लाख रुपयाची कामे पुर्ण होणार आहेत तसेच करंजी ओवरा नागरी आदिवासी वस्ती सुधारणा योजने अंतर्गत कोटीचा पुलाचे काम पुर्ण झाले असुन त्याकामाचे लोकार्पण लवकरच करण्यात येणार आहे.

विरोधकांचा भुलथापाना बळी पडु नका, विकास कामानां साथ दया, प्रत्येक नगरसेवकांने आपल्या वार्डाचा समस्या दुर केल्या पाहीजे, तसेच आरोग्या कडे पण लक्ष दिले पाहीजे वार्डात फवारणी केली पाहीजे असे सांगितले.

शिरीष नाईक म्हणाले की, आमच्या जेष्ठ नेत्यांचा प्रयत्नामुळे नगरपालिकेत वर्षात सतत विकास कामे चालु आहेत. जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कल्लशेट्टी यांचा प्रयत्नाने गर्‍याच विकास कामाना चांगला चालना मिळाली आहे.

पाण्याचा टाकीमुळे या भागात पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार आहे. विरोधक आरोप प्रतीआरोप तर करणारच आहे या कडे लक्ष न देता विकास कामा कडे लक्ष दिले पाहीजे.कॉग्रसची सत्ता आहे आणि यापुढे पण राहाणारच आहे.

 

LEAVE A REPLY

*