शहाद्यात तरुणीवर अत्याचार : माजी नगरसेवकपुत्रासह तिघांना अटक

0
शहादा | ता.प्र. :  बनावट नाव धारण करून मालेगांव येथील एका युवतीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करुन तिचा शारिरीक उपभोग घेत मित्रांनाही शारीरिक संबंध करु देण्यास भाग पाडणार्‍या शहादा येथील माजी नगरसेवक पुत्रासह तिघांना मालेगाव पोलीसांनी आज दि.११ रोजी दुपारी शहाद्यातून ताब्यात घेतले.

विशेष म्हणजे या माजीनगरसेवकपुत्राला गंभीर आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

नगाव शिवार चंदनपुरी ता.मालेगाव (जि.नाशिक) येथील एका २९ वर्षीय युवतीशी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना राज पाटील असे बनावट नाव धारण करून शहादा येथील कलीम कमील अन्सारी रा.खेतीयारोड (शहादा) याने प्रेमसंबंध जुळविले.

यातून कलीम उर्फ राज याने युवतीशी शारिरीक संबंध ठेवले. दरम्यान दि.१७ सप्टेंबर २०१४ रोजी शहादा येथे तो त्या युवतीसोबत एनआरआय व्हिला, विमलनगर येथे राहत होता.

या कालावधीत त्या युवकाने तिच्याशी शारिरीक संबंधासोबत अनैसर्गिक कृत्य केले तसेच साथीदार इम्रान, जाकीर, जावेद व राहुल यांच्याशीही वारंवार शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले.

युवतीने नकार दिला असता तिला जिवेठार मारण्याची धमकी दिली. त्याप्रसंगी व्हिडीओ क्लिपही बनवली. दरम्यान कालावधीत सदर युवती नंदुरबार येथे नातेवाईकांकडे गेली असता दि.२९ एप्रिल २०१७ रोजी महिला दक्षता समितीसमोर ही घटना कथन करण्यात आली.

याचा राग येवून दोन अज्ञात इसमांनी त्या युवतीस नंदुरबार येथे जावून धमकी दिली. युवतीसोबत दि.४ मे रोजी दक्षता समितीने कलीमसह आई व वडीलांना तपासासाठी नंदुरबारला बोलविले.

हा प्रकार काही सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना माहिती झाल्यानंतर घटनेप्रकरणी मालेगांव पोलीसात कलीम अन्सारी, त्याची आई खलिदा, वडील कामील, भाऊ जमील व तन्वीर तसेच त्याचे मित्र इम्रान, जाकीर, जावेद व राहुल यांच्याविरोधात गुरनं १०७/२०१७ नुसार भादंवि ३७६ (के) (एम), (एन) अनुसूचित जाती जमाती कायदा कलम ३ (१) (२) अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याप्रकरणी मोलगाव पोलीसाचे एक पथक पीएसआय व्ही.एस. चवळी यांच्या नेतृत्वाखाली शहाद्यात दि.११ मे रोजी दुपारी दाखल झाले.

दुपारी २ वाजेच्या सुमारास पोलीसांनी कलीम कामील अन्सारी, जमील कामील अन्सारी, कामील अन्सारी यांना ताब्यात घेवून पथक  रवाना झाले. या घटनेने शहरात चर्चेला उधाण आले आहे.

LEAVE A REPLY

*