ट्रकची मोटारसायकलला धडक, दोघांचा मृत्यू

0
नंदुरबार । दि.12 । प्रतिनिधी-अक्कलकुवा तालुक्यातील लहान राजमोही फाटयाजवळ मोटरसायकल व ट्रकची धडक होवून झालेल्या अपघातात नंदुरबार येथील दोघांचा मृत्यू झाला.

दिपक दत्तु गोसावी रा.वाण्याविहिर (ता.अक्कलकुवा) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, ट्रक (क्र.एम.एच.18-ं एए.5819) क्रमांकाच्या ट्रकवरील अज्ञात चालकाने समोरून येणार्‍या मोटरसायकल (क्र.एम.एच.39- ए.6136) या वाहनाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात रमेश भरम पाडवी, मनिष भरत पाडवी या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*