अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावे !

0
नंदुरबार । दि.12 । प्रतिनिधी-अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काररत्न द्यावा अशी मागणी माजीमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी आज नंदुरबार येथे पत्रकार परिषदेत बोलतांना केली.
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात मातंग समाजाच्या प्रबोधनासाठी काढण्यात आलेल्या संवाद यात्रेनिमित्त ते आज नंदुरबार येथे आले होते.
1 ऑगस्टपासून या यात्रेला पश्चिम महाराष्ट्रातून प्रारंभ झाला. दि.8 ते 12 ऑगस्ट दरम्यान ते उत्तर महाराष्ट्रात संवाद यात्रा घेवून आले आहे.

दि.31 ऑगस्टला मुंबई येथील चिरागनगर येथे संवाद यात्रेची सांगता होणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

मातंग समाज हा अद्यापही सर्व सामाजापासून दुर्लक्षित असून मागासवर्गीय समाजात देखील मातंग समाजाला अद्याप उपेक्षित ठेवण्यात आले आहे.

त्यामुळे मातंग समाजाचे अनेक प्रश्न तसेच आहे. मातंग समाजाने आपली मुल पहिल्या शाळेत मिरवणूकीने घालणे हा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा एक भाग आहे.

आरोग्य, शिक्षण, बचत गट यामध्ये पुढाकार घेवून मातंग समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

सैन्य भरती, पोलीस भरती, एसआरपी यासाठी मातंग समाजाने आपली मुल तयार ठेवली पाहिजे, गावात बौध्दांची चार घरे असली तरी गांव वचकतं पण मातंग समाजाला गृहीत धरले जाते, आपल्या नोकरी, धंदा व आरक्षण सवलत हवे असे तर बौध्दाप्रमाणे संघटीत होण्याची गरज आहे.

काटकसर करून 50 ते 100 रूपये बचत केली पाहिजे असेही आवाहन समाज बांधवांना केले. मागासवर्गीय महामंडळाची कर्ज माफ करण्यात यावी. अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मातंग समाजातील पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*