गाव हगणदारीमुक्तीसाठी महिलांनी पुढाकार घ्यावा !

0
नंदुरबार । दि.10 । प्रतिनिधी-आदिवासी समाजात स्वच्छतेला पुर्वापार महत्व आहे. आपले जीवन निरोगी व समृध्द होण्यासाठी शौचालय बांधून त्याचा नियमित वापर केला पहिजे.
शौचालय बांधकामासाठी महिलांनी पुढाकार घेवून गाव हागणदारीमुक्त करावे असे आवाहन जि.प. अध्यक्षा सौ.रजनी नाईक यांनी केले.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत खुले मे शौच से आझादी या अभियानाच्या कोळदा (ता.नंदुरबार) येथे आयेजित कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमास प्रमुख पाहूण म्हणून जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे, पं.स. सभापती सौ.रंजना नाईक, उप्रमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सारीका बारी, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, उपशिक्षणाधिकारी राहुल चौधरी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात दि.9 ऑगस्ट ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत सर्व ग्रामपंचायतींमध्ये शौचालय नसणार्‍या या कुटूंबाना शौचालय बांधकाम व वापर करण्यास प्रवृत्त करण्यासाठी ङ्गखुले मे शौच से आझादी हे अभियान सुरू करण्यात आले आहे.

या अभियानाला जोडूनच राज्य शासनातर्फे संकल्प स्वच्छतेचा स्वच्छ महाराष्ट्राचा अभियान ही राबविण्यात येत आहेत. या अभियानाच्या लढा स्वच्छतेचा जागर हागणदारीमुक्तीचा हे घोष वाक्य आहे.

जिल्ह्यातील शौचालय नसलेल्या कुटूंबापर्यंत पोहचून त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करणे तसेच ज्या कुटूंबांकडे शौचालय आहे. मात्र शौचालयाचा वापर होत नाही.

अशा कुटूंबाची गृहभेटीच्या माध्यमातून संवाद साधून त्यांना शौचालय वापर करण्यासंदर्भात प्रवृत्त करणे हा उद्देश अभियानाचा आहे.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र बिनवडे म्हणाले की, आरोग्य व समृध्द जीवनासाठी स्वच्छता महत्वाचा घटक आहे.

यामुळे प्रत्येकाने वैयक्तीक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेला महत्व द्यावे. यासाठी नावाने एकत्र येवून एकजुटीने काम करावे. यासाठी बाहेरील स्वच्छतेप्रमाणे मनाचीही स्वच्छता करावी व गावाला आदर्श करावे असे आवाहन केले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी गावातून स्वच्छती फेरी काढून स्वच्छतेविषयी घोषणा दिल्यानंतर जि.प. अध्यक्षा सौ.रंजनी नाईक, मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे, पं.स. सभापती सौ.रंजना नाईक, उपमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.सारीका बारी, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर गटसंसाधन केंद्र कर्मचारी, उपशिक्षणाधिकारी राहुल चौधरी, सरपंच रतगीबाई पाडवी, उपसरपंच सुभाषचंद्र राजपूत, ग्रामविकास अधिकारी संजय देवरे, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील कर्मचारी यांनी गृहभेटी देवून ग्रामस्थांना शौचालयाचे महत्व पटवून देवून त्यांना शौचालय बांधकाम व वापर याविषयी मार्गदर्शन केले तसेच घरांवर स्वच्छता दर्शक स्टिकर्स लावण्यात आले.

प्रास्ताविकात उपमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.सारीका बारी यांनी शासनातर्फे दि.9 ऑगस्ट ते 2 ऑक्टोंबअर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या खुले मे शौच से आझादी या अभियानाचा उद्देश समजावून सांगितला.

सुत्रसंचालन व आभार उपसरपंच सुभाषचंद्र राजपूत यांनी मानले. कार्यक्रमाला गावातील सर्व शासकीय कर्मचारी स्वच्छ भारत मिशनचे तालुका व जिल्हास्तरावरील अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*