नंदुरबार । प्रतिनिधी-राज्यातील नगरपालिका कर्मचार्‍यांना सात वा वेतन आयोग लागू करणे रोजंदारी, कंत्राटी कर्मचारी, अनुकंपाधारक यांच्या प्रलंबित मागण्यासाठी सामूहिक रजा आंदोलन व धरणे देण्यात आले.

सातवा वेतन आयोग लागू करणे रोजंदारी कर्मचारींना कायम करणे आदी मागणी संदर्भात गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून नगर पालिका कर्मचारी संघटनांनी अनेक वेळा आंदोलनही केलेले आहेत व शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे तरी शासन हेतुपूरस्कार न.पा. कर्मचार्‍यांचा मागण्या पूर्ण करीत नाही.

सदरच्या मागण्यापूर्ण होत नसल्याने राज्यातील सर्व संघटनांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य नगर पालिका, नगर पंचायत, मुख्याधिकारी कर्मचारी संघटना व संवर्ग कर्मचारी संघटना संघर्ष समितीने न्याय मागण्या मान्य करणे करीता पालिकेतील सर्व कम्रचारी एक दिवसाचे सामूहिक रजा व धरणे आंदोलन केले.

शासनाने सदर मागण्या मान्य न केल्यास पालिका मधील अत्यावश्यक सेवासह कर्मचारी दि.21 ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन करतील.

या आंदोलनाच्या नोटीसा शासनाकडे या पुर्वीच सादर केलेल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरू राहिली. असे पालिका कर्मचार्‍यांनी सांगितले आहे.

 

LEAVE A REPLY

*