गट तट विसरुन कोळी समाजाने एकत्र यावे – अनंत तरे

0
कळंबू ता. शहादा । दि.10 । वार्ताहर-राज्यातील कोळी समाज एकत्र झाल्यास सरकार बनविण्याची व सरकार पाडण्याची क्षमता महाराष्ट्रातील कोळी समाजात आहे.
समाजाच्या हितासाठी पक्ष, गत, तट विसरून समाजाने एकत्र यावे असे आवाहन महाराष्ट्र कोळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.अनंत तरे यांनी वडाळी (ता.शहादा) येथे कोळी समाज बांधवांच्या मेळाव्यात केले.
कोळी समाज बांधवांच्या मागण्यांच्या आंदोलनात पोलीस गोळीबारात शहिद झालेल्या भटू कुवर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित कोळी समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कोळी समाज संघाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्कर कुवर, सचिव मदन भोई, वाल्मिक सेना संस्थापक अध्यक्ष शानाभाऊ सोनवणे, महिला अध्यक्ष इंदुबाई सोनीस, कोळी समाज जिल्हाध्यक्ष नामदेव येळवे, उपाध्यक्ष संजय निकुम, सचिव कांतीलाल सोनीस, वाल्मिक एकलव्य सेनेचे जिल्हाध्यक्ष पवन सोनवणे आदींसह पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

समाजाच्या न्याय हक्कासाठी आमी सदैव लढ्यास तत्पर आहोत, भटू कुवर चे बलिदान वाया जाऊ देणार नाही असे यावेळी शानाभाऊ कुवर यांनी सांगितले तर नामदेव येळवे यांनीही मनोगत व्यक्त केले.

तरे यांनी कै. भटू कुवर यांच्या घरी भेट देऊन भटू कुवर यांच्या परिवारातील दशरथ कुवर, छोटू कुवर व दशरथ कुवर यांचेशी संवाद साधून चौकशी केली व भटू कुवार यांच्या पत्नी भावनाबाई कुवर यांनी त्यांना राखी बांधली.

श्री.तरे यांनी भटू कुवाराच्या पुतळ्याला माल्यार्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्याच प्रमाणे दारा धरणात मृत्युमुखी पडलेल्या युवकांनाही श्रद्धांजली वाहिली.

कोळी समाजाशी संबंधित रामनाथ कोविंद राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्या बद्दल त्यांचे अभिनंदन या मेळाव्यात करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना व सुत्रसंचालन नरेंद्र निकुम यांनी केले. तर आभार प्रदर्शन कांतीलाल सोनीस यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थीत होते.

 

LEAVE A REPLY

*