विकासकामांसाठी 25 लाखांचा निधी मंजूर

0
मोदलपाडा/बोरद /  शिरपूर येथील आ.अमरीशभाई पटेल यांनी तळोदा पालिकेला विकास कामांसाठी स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत 25 लाखांचा निधी मंजूर केला आहे.
या निधीतून चारही प्रभागात एल.इ.डी लाईट बसविले जाणार आहे. उर्वरित निधीत चिनोदा ते शहादा रस्त्यादरम्यान डिव्हाईडर पोल व एल.इ.डी. लाईट बसविले जाणार आहे.

तळोदा पालिका ही क वर्गात मोडत असल्याने, पालिकेला विकासकामी आवश्यक निधी प्राप्त होत नसल्याने शासन अनुदान अथवा आमदार तथा खासदार त्यांचे निधीवर अवलंबून राहावे लागते.

याकरिता माजीमंत्री पद्माकर वळवी, गटनेते भरत माळी यांच्या मार्गदर्शनाने पालिकेचे नगरसेवक संजय माळी, सुभाष चौधरी, गौरव वाणी, पंकज राणे, प्रकाश ठाकरे, सतीवन पाडवी, गणेश पाडवी, रईस अली, आदींनी आ.अमरीश पटेल यांच्या निवरसस्थानी भेट घेऊन विकास कामांसाठी निधीची मागणी केली होती.

यावर आ.अमरीश पटेल यांनी तात्काळ तळोदा शहरातील चारही प्रभागाकरिता स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत या आर्थिक वर्षात 25 लाखाचा निधी मंजूर केला आहे.

 

LEAVE A REPLY

*