कोठली येथे आदिवासी संस्कृती दर्शन दालनाचे उद्घाटन

0
नंदुरबार । दि.09 । प्रतिनिधी-तालुक्यातील कोठली येथील शासकीय कन्या आश्रमशाळेत विश्व आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा स्काऊट-गाईड नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धा व आदिवासी संस्कृती दर्शन दालनाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास शेगजी वळवी, जिल्हा संघटक आयुक्त (स्काऊट) महेंद्र वसावे, जिल्हा संघटक आयुक्त (गाईड) श्रीमती कविता वाघ, ग्रा.पं.सदस्य जगदीश पाटील, मुख्याध्यापक ए.जे. पाडवी आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध आदिवासी वेषभूषा धारण केल्या होत्या.

यावेळी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, आदिवासी लोकनृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.दिपाली पाटील यांनी केले.

 

LEAVE A REPLY

*