शिष्यवृत्ती घोटाळ्यातील 11वा आरोपी गजाआड ; संतोष दळवी यास मध्यप्रदेशातील धार येथून अटक

0
मोदलपाडा, ता.तळोदा । दि.5 । वार्ताहर-तळोदा येथील एकत्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील बोगस शिष्यवृत्ती घोटाळयातील शेवटचा आरोपी तब्बल दोन वर्षानंतर गजाआड करण्यात आला आहे.
संतोष अर्जुन दळवी रा.आष्टी (जि. बीड) याला आज सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास धामनारे जि.धार (मध्यप्रदेश) येथील हॉटेल रॉयल पॅलेसमधून अटक करण्यात आली.
दळवी हा येथील प्रकल्प कार्यालयात झालेल्या शिषवृत्ती अपहारातील 11 वा आरोपी आहे. त्याला आज अक्कलकुवा न्यायालयात दाखल केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे विद्यार्थ्यांना विविध कौशल्यपूर्ण प्रशिक्षणासाठी विविध संस्थामार्फत प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यावेळी प्रशिक्षणार्थींना शिष्यवृत्ती देण्यात आली होती.

परंतु प्रशिक्षण देणार्‍या संस्था बोगस असल्याने प्रशिक्षण न देता कोटयावधी रूपयांच्या शिष्यवृत्तीचा अपहार करण्यात आला.

यासंदर्भात तत्कालीन प्रभारी प्रकल्प अधिकारी अण्णा थोरात यांनी 8 कोटी 79 लाख 37 हजार रूपये अपहार झाल्याची फिर्याद तळोदा पोलीस ठाण्यात दि.5 ऑक्टोंबर 2015 ला दिली होती.

त्यानुसार आतापर्यंत तत्कालीन प्रकल्पाधिकारी शुक्राचार्य दुधाळ, लिपीक दिनेश कोळी, तुळजाभवानी महिला आष्टी (जि. बीड) श्रीमती नालंदा खाडे, संगिता विष्णु दळवी, कमल मधुकर दळवी, भिकचंद संपत पाटील रा. रंजाने (ता.शिंदखेडा), साहेबराव मंगा बागुल रा.भालेर (ता.नंदुरबार), हिराबाई दिपचंद पाटील (रा.रंजाने ता. शिंदखेडा), मगन साकर्‍या वळवी रा. नंदुरबार, विष्णु अर्जुन दळवी रा. आष्टी (जि. बीड) अशा दहा आरोपी यापुर्वीच अटक करण्यात आली आहे.

आज सकाळी संतोष अर्जुन दळवी रा. आष्टी (जि. बीड) याला मध्यप्रदेशातील धार जिल्हयातील धामनारे येथील हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये अटक करण्यात आली.

तुळजा भवानी महिला मंडळ आष्टी या संस्थेला मिळालेल्या साडेसहा कोटी रूपयांच्या रक्कमेपोटी दीड कोटी घेतले होते. त्यातून त्याने शहादा, प्रकाशा, नंदुरबार आदी प्लॉट व जमिनींची खरेदी केल्याचे समजते.

आतापर्यंत 11 आरोपींना अटक झाली असून त्यातील कमल मधुकर दळवी या मयत झाल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिलींद वाघमारे यांच्या पथकाने केली.

 

LEAVE A REPLY

*