शहादा-खेतिया रस्त्यावर ‘दि बर्निंग व्हॅन’

0
शहादा । ता.प्र.-येथील शहादा-खेतिया मार्गावर शहाद्याहून खेतियाकडे जाणर्‍या एका मारूती व्हॅनने अचानक पेट घेतल्याने एकच धावपळ उडाली.
या घटनेमुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. काल दि.4 रोजी रात्री नऊ वाजता दराफाट्यानजिकच्या मयुर पेट्रोलपंपच्या पुढे ही घटना घडली.
शहादा-खेतीया मार्गावर काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास मारूती व्हॅन भरधाव वेगाने शहाद्याहून खेतियाकडे जात होती. दराफाटयाच्या अलिकडे मयुर पेट्रोलपंपाजवळ अचानक या व्हॅनने पेट घेतला.

चालकाला काही कळण्याच्या आत व्हॅन चारही बाजुने आगीचा ज्वालांनी वेढली गेली. प्रसंगावधान राखून चालकाने व्हॅन थांबवून पळ काढला. बघता-बघता व्हॅनने पूर्ण पेट घेतला.

व्हॅन जळत असताना रस्ताच्या दुतर्फा वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन घबराट पसरली होती. पेटलेली व्हॅन गॅस सिलींडरवर चालणारी असल्यामुळे स्फोट होण्याच्या भितीने लगतच्या पट्रोलपंप चालकांमध्ये व वाहन चालकामंध्ये भितीचे वातावरण पसरले होते.

द बर्निग व्हॅन पाहण्यासाठी वाहन चालक व बघ्याची मोठी गर्दी झाली होती. घटनेपासून हाकेच्या दराफाटा नजिक शहादा पोलिसांची पोलिसाची चौकी आहे. मात्र, या चौकीवर एकही पोलिस कर्मचारी नसल्याने व घटनेची त्यांना कुठलीही माहिती नसल्याने ते अनभिज्ञ होते.

दरम्यान, आगीमुळे व्हॅन पुर्ण पणे जळून खाक झाली होती. कुणीतरी ही शहादा पालिकेचा कळविल्याने पालिकेच्या अग्नीशामन बंब घटनास्थळी पोहचले.

मात्र, तोपर्यंत व्हॅन पुर्णपणे खाक झाली होती. सुदैवाने या आगीत गॅस सिलींडर फुटला नसल्याने मोठी दुर्घटना टळली. व्हॅन पूर्ण जळाल्याने व चालकाने पोबारा केल्याने वाहन नंबर मिळू शकला नाही.

ही व्हॅन खेतिया येथील एका व्यापार्‍याची असल्याचे समजते. व्हॅन जळत असताना सुमारे एक ते दीड तास वाहनाची मोठी रांग लागलेली होती.

 

LEAVE A REPLY

*