पालिका कर्मचार्‍यांची 9 ऑगस्टला सामूहिक रजा

0

नवापूर । दि.05 । प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका/नगर पंचायती मधील मुख्याधिकारी, कर्मचारी, संवर्ग कर्मचारी कामगार, रोजंदारी कर्मचारी, अनुकंपाधारक यांच्या प्रलंबित मागण्या पुर्ण न झाल्यामुळे दि.9 ऑगस्ट रोजी न.पा.कर्मचार्‍यांचे सामुहिक रजा आंदोलन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य नगर पालिका, नगरपंचायत, मुख्याध्यापक, कर्मचारी व संवर्ग कर्मचारी कामगार संघटना संघर्ष समिती, महाराष्ट् राज्य मुख्याधिकारी संघटना, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, महाराष्ट्र राज्य नगर परिषद/महानगर नगरपालिका कर्मचारी महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघ, म्युनिसिपल एम्प्लाँईज युनियन, महाराष्ट्र राज्य सफाई कामगार कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र रोजंदारी कर्मचारी कृती समिती, सर्व सफाई कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका/नगर पंचायती मधील मुख्याधिकारी, कर्मचारी, संवर्ग कर्मचारी कामगार, रोजंदारी कर्मचारी, अनुकंपाधारक यांच्या प्रलंबित मागण्या पुर्ण न झाल्यामुळे त्याच्या अंमलबजावणीकरिता दि 9 आँगस्ट 2017 ला सामुहिक रजा आंदोलन आणि दि.21 ऑगस्ट 2017 पासुन बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.

निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील नगर पालिका मधील कार्यरत सर्व मुख्याधिकारी,कर्मचारी,रोजंदारी, कंत्राटी कर्मचारी, अनुकंपाधारक यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात संघटने मार्फत बरेच आंदोलने करुन निवेदने दिली आहेत.

शासनाकडे वेळोवेळो पाठपुरावा केला आहे. शासन स्तरावर मागण्यासंदर्भात बैठका होतात परंतु मागण्या पुर्ण होत ऩाहीत. त्यामुळे राज्यातील सर्व संघटनांचे संयुक्त विद्यमाने दि.9 ऑगस्ट ला एक दिवसाचे सामुहिक आंदोलन होणार आहे.

शासमाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर पालिकेतील सर्व कर्मचारी 21 ऑगस्टपासुन बेमुदत काम बंद आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर कार्यालय निरीक्षक मिलिंद भामरे, आरोग्य निरीक्षक भरत पाटील, सुधिर माळी, राजेंद्र चव्हाण, राजु गावीत, वामन अहिरे, प्रशांत भट, एस.जे.शिरसाठ, रमेश गावीत, मधुकर राजपुत, परशराम ठाकरे, अनंत पाटील, एन.बी.अहिरे, आर.डी.बागले, डी.एच.मराठे, संतोष वाघ,युवराज पानपाटील, अशोक दंडोरे, भरत सोनार, प्रमिला वसावे, सतिष बागुल आदींच्या सह्या आहेत.

 

LEAVE A REPLY

*